राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींबाबत त्या परखडपणे आपली मतं मांडताना दिसतात. अनेक फोटो व व्हिडीओही त्या शेअर करत असतात.

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतानाचा व्हिडीओ अमृता यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्या पतंग उडवताना दिसल्या होत्या. तसेच चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छाही त्यांनी या व्हिडीओतू दिल्या होत्या. परंतु, या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. अमृता फडणवीस यांचा पेहराव व त्यांनी मराठी भाषेत दिलेल्या शुभेच्छावर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.

अमृता यांच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत “आम्ही तीळगूळ घेऊन गोड बोलू पण तुम्ही मराठीत नीट बोला”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “तीळगूळ घ्या मराठी नीट बोला”, अशी कमेंट केली आहे. “मराठी नीट बोला”, अशीही कमेंट एका युजरने केली आहे. “देवेंद्रजी, बायकोला मराठी बोलायला शिकवा”, अशी कमेंटही एकाने केली आहे. तर एका युजरने अमृता यांच्या लूकवर कमेंट करत त्यांना ट्रोल केलं आहे. “तीळगूळ घ्या, कपडे नीट घाला(सणावराला)”, अशी कमेंट एकाने केली आहे.

amruta fadnvais troll

अमृता या पेशाने बॅंकर असून त्यांना गाण्याचीही आवड आहे. आजवर त्यांनी अनेक गाण्यांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचं “आज मे मूड बना लिया” हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं.