राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे ‘मूड बना लिया’ हे गाणं प्रदर्शित झालं. त्यांच्या गाण्याला तुफान हिट मिळाल्या आहेत. अमृता फडणवीसांनी स्वतः हे गाणं गायलं असून त्या या गाण्यामध्ये डान्स करतानाही दिसत आहे. त्यानंतर आता अमृता फडणवीसांनी मकरसंक्रांतीनिमित्त त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
सध्या सर्वत्र मकरसंक्रांतची धामधूम पाहायला मिळत आहे. या निमित्ताने घराघरांत तिळाचे लाडू, चिक्की असे अनेक पदार्थ बनवले जात आहेत. तिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोला, असे म्हणत तिळगुळ वाटून प्रत्येकाला शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर दुसरीकडे ठिकठिकाणी पतंग उडवतानाही दिसत आहे. सध्या अनेक सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहात मकरसंक्रांतीचा सण साजरा करताना दिसत आहे. नुकतंच अमृता फडणवीसांनी पतंग उडवतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : “राजकारणात जायला हवं” म्हणत अमृता फडणवीसांनी दिले संकेत, म्हणाल्या “मोठे नुकसान…”
“संक्रमण नवपर्वाचे, विकासाभिमुख महाराष्ट्राच्या उत्तुंग भरारीचे ! मकरसंक्रमणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!”, असे म्हणत अमृता फडणवीसांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याबरोबर त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओत त्या पतंग उडवताना दिसत आहे. यात त्या ‘मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’ असा संदेशही देताना दिसत आहे.
आणखी वाचा : ‘मूड बना लिया’ गाण्यावर लेकीची प्रतिक्रिया काय होती? अमृता फडणवीस म्हणाल्या…
दरम्यान अमृता फडणवीस यांनी गायलेलं ‘मूड बना लिया’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर हिट होताना दिसत आहे. या गाण्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काहीजण त्यांचं कौतुक करत आहेत तर काहींनी त्यांना ट्रोल केलं आहे. यापूर्वीही त्यांची काही गाणी प्रदर्शित झाली होती. ‘मूड बना लिया’प्रमाणेच ती गाणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती.