बॉलीवूड तारे-तारकांची स्टाईल, त्यांची फॅशन याचा भारतातील जनमानसावर विशेषत: तरुणाईवर प्रचंड पगडा आहे. शाहरुख खानपासून ते सोनम कपूपर्यंत विविध सेलिब्रिटी चित्रपटांमध्ये आणि प्रत्यक्ष आयुष्यामध्ये जे कपडे घालतात त्याचे अनुकरण तरुणपिढी सर्रास करते. सेलिब्रिटीजभोवती असलेल्या याच वलयाचा फायदा करून घेत कित्येक नामवंत भारतीय आणि पाश्चात्त्य ब्रॅण्ड्सनी या सेलिब्रिटीजना ब्रॅण्ड्समध्ये ‘फॅशन डिझायनर्स’चे पद देऊ केले आहे. एखादा सेलेब्रिटी बॅ्रण्डचा चेहरा असणे आणि त्याला प्रत्यक्ष फॅशन डिझायनर म्हणून समोर आणणे, यामध्ये तफावत असते आणि यामुळे डिझायनर्सचे नाव पडद्याआड जात असल्याने भारतीय फॅशन डिझायनर्स यांनी मात्र या प्रकाराला विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे.
नुकतेच ‘सत्यापॉल’ बॅ्रण्डने गौरी खानची नियुक्ती फॅशन डिझायनर म्हणून केली आहे. त्याआधी ‘व्ॉन हुसेन’ने दीपिका पदुकोन, ‘वेरो मोडा’ने करण जोहर, ‘जबाँग डॉट कॉम’ने आलिया भटला त्यांच्या ब्रॅण्डअंतर्गत डिझायनर म्हणून नियुक्त केले आहे. याबद्दल भारतातील अनेक फॅशन डिझायनर्सनी आक्षेप नोंदविण्यास सुरुवात केली आहे. ‘सेलिब्रिटीचा चेहरा आहे म्हणून त्या बॅ्रण्डकडे लोक आकर्षित होतात, पण मुळात ते कलेक्शन तयार करण्यासाठी सेलिब्रिटी किती मेहनत घेतात, हा यातील वादाचा मुद्दा असल्याचे,’ डिझायनर वैशाली एस सांगतात. या ब्रॅण्ड्सचे कलेक्शन्स तयार करणारे डिझायनर्स वेगळे असतात, सेलिब्रिटी कुठेही या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाहीत. फक्त जाहिरातीमध्ये त्यांचा चेहरा दिसतो. त्यामुळे जर सेलिब्रिटी एखाद्या ब्रॅण्डचा चेहरा म्हणून समोर येत असतील, तर त्यास डिझायनर्सचा आक्षेप नाही, पण त्यांना ‘फॅशन डिझायनर’ हे बिरुद देण्यास डिझायनर्सचा आक्षेप आहे. त्यामुळे मूळ मेहनत पडद्यामागचे डिझायनर्स करतात, पण सर्व श्रेय मात्र सेलिब्रिटींना मिळते, नव्याने येणाऱ्या डिझायनर्ससाठी हा ट्रेंड धोकादायक असल्याचे डिझायनर प्रणोय कपूर सांगतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा