झी मराठीवरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. यापैकी एक मालिका म्हणजे देवमाणूस. या मालिकेच्या पहिल्या पर्वाने गेल्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. या मालिकेच्या शेवटच्या भागानंतर प्रेक्षक फार आतुरतेने दुसऱ्या भाग कधी येणार याची वाट पाहात होते. अखेर प्रेक्षकांची उत्सुकता फार काळ न ताणता अल्पावधीतच देवमाणूस २ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि मालिकेच्या या पर्वाने देखील प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि देवीसिंग हा नटवर बनून गावात आला आहे. पण डिम्पलला पूर्ण खात्री आहे कि तो देवीसिंग आहे आणि त्यानेच सलोनीचा खून देखील केला आहे. त्यामुळे डिम्पल त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा करतेय पण देवीसिंग तिच्या हाती काही लागू देत नाही आहे.

त्या दोघांच्या पुरावे गोळा करण्याच्या या झटापटीमध्ये देवीसिंग डिम्पलचा काटा काढायचं ठरवतो. मालिकेत पुढील आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल कि देवीसिंग डिम्पलवर जीवघेणा हल्ला करणार आहे. तेव्हा डिम्पल या सगळ्यातून सुखरूप वाचेल कि डिम्पलचा प्रवास संपेल? हे प्रेक्षकांना पुढील आठवड्यातील भागात कळेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devamanus serial update devi singh dimpal avb