Devara box office collection day 5: कोराताला शिवा लिखित, दिग्दर्शित ‘देवरा: पार्ट १’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सोमवारी ( ३० सप्टेंबर ) जरी चित्रपटाची कमाई कमी झाली असली तरी मंगळवारी ( १ ऑक्टोबर ) या कमाईत चांगलीच वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या पाच भाषेत चित्रपटाला प्रेक्षक उदंड प्रतिसाद देत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘देवरा: पार्ट १’ चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआरसह जान्हवी कपूर झळकली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जान्हवीने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, जान्हवी व्यतिरिक्त सैफ अली खान, प्रकाश राज, श्रीकांत, शाइन टॉम चाको, नारायण आणि श्रुती मराठे यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा – Video: “फिनाले तिकीट मिळालं तरी ट्रॉफीपर्यंत…”, सुरेखा कुडचींनी निक्कीला लगावला टोला; ‘या’ सदस्याने शो जिंकवा, व्यक्त केली इच्छा

सॅकनिल्कच्या माहितीनुसार, २७ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटाने सोमवारी १२.७५ कोटींची कमाई केली होती. याच कमाईत मंगळवारी वाढ झाली. ‘देवरा: पार्ट १’ने १ ऑक्टोबरला १३.५ कोटींचा गल्ला जमावला. आतापर्यंत ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या चित्रपटाने एकूण १८६ कोटींची कमाई केली आहे. तसंच जगभरात ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटाने ३४० कोटी कमावले आहेत.

हेही वाचा – Video: “याला स्वतःच्या हिंमतीवर पुढे जायचं नाहीये”, अंकिताने अभिजीतला लगावला टोला, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

हेही वाचा – Video: …म्हणून निक्कीला आला अंकिताचा राग, जान्हवीला म्हणाली, “ही एक नंबरची कुचकी पोरगी आहे”

माहितीनुसार, ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटासाठी ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या चित्रपटाला IMDbवर १०मधील ६.६ रेटिंग मिळालं आहे. आज ( २ ऑक्टोबर ) ४६ लाख रुपयांचं अ‍ॅडवान्स बुकिंग करण्यात आलं आहे. त्यामुळे चित्रपट गुरुवारपर्यंत ३५० कोटींची कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटाच्या तेलुगू व्हर्जननंतर हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद मिळत आहे. हिंदी व्हर्जनने मंगळवारी ४ कोटी २४ लाखांची कमाई केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devara box office collection day 5 jr ntr saif ali khan and janhvi kapoor starrer is set to cross rs 200 cr all india pps