Devara Part – 1 : २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर या चित्रपटाच्या माध्यमातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात जान्हवी सुपरस्टार्स ज्युनियर एटीआरबरोबर पाहायला मिळणार आहे. काल, ५ ऑगस्टला ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटातील दुसरं गाणं ‘धीरे-धीरे’ प्रदर्शित झालं. या रोमँटिक गाण्यातील ज्युनियर एनटीआर व जान्हवी कपूरच्या रोमान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण संगीतकाराने ‘धीरे-धीरे’ गाणं कॉपी केल्याचा दावा नेटकरी करत आहेत.

‘देवरा: पार्ट १’ ( Devara Part – 1 ) चित्रपटातील ‘धीरे-धीरे’ हे रोमँटिक गाणं तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या पाच भाषेत प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात ज्युनियर एनटीआर व जान्हवीची सुंदर केमिस्ट्री दिसत आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदरने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तर लोकप्रिय गायिका शिल्पा रावने गायलं आहे. तसंच कौसर मुनीर ‘धीरे-धीरे’ गाण्याचे गीतकार आहेत. ‘बँग बँग’, ‘तौबा तौबा’ सारख्या सुपरहिट गाण्यांचा नृत्यदिग्दर्शक बॉस्को मार्टिसने ‘धीरे-धीरे’चं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. अशा तगड्या कलाकार मंडळींनी ज्युनियर एनटीआर व जान्हवी कपूरच्या या रोमँटिक गाण्यासाठी काम केलं आहे. पण सोशल मीडियावर गाण्याच्या संगीतकाराला म्हणजे अनिरुद्धला ट्रोल केलं जातं आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Family recreate iconic Hum Aapke Hain Koun scene
‘गाने बैठे गाना, सामने…’ कुटुंबातील सदस्यांनी ‘हम आपके है कौन’मधील ‘ते’ गाणं केलं रिक्रिएट; VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Devara Part – 1

हेही वाचा – Bigg Boss Marathi : छोट्या पुढारीसमोर हात जोडून अंकिता प्रभू वालावलकर पडली पाया, नेमकं काय घडलं? पाहा…

नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की, तीन वर्षांपूर्वी सुपरहिट झालेलं योहानीचं ‘माणिक मागे हिते’ गाण्याची कॉपी केली आहे. ‘धीरे-धीरे’ गाण्याचं संगीत ‘माणिक मागे हिते’सारखं असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे संगीतकार अनिरुद्ध रविचंदरला सध्या ट्रोल केलं जातं आहे.

नेटकरी काय म्हणतायत पाहा…

हेही वाचा – “शेतकऱ्याची पोरं…”, ऑलिम्पिकमध्ये अविनाश साबळेची कामगिरी पाहून हेमंत ढोमे भारावला, म्हणाला, “प्रचंड अभिमान…”

दरम्यान, ‘देवरा: पार्ट १’ ( Devara Part – 1 ) चित्रपटाचं चित्रकरण जवळपास पूर्ण झालं आहे. माहितीनुसार, चित्रपटातील काही गाण्यांचं चित्रीकरण बाकी असून लवकरच ते पूर्ण केलं जाणार आहे. कोराताला शिवा लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूरसह ( Janhvi Kapoor ) सैफ अली खान, श्रुती मराठे, प्रकाश राज, श्रीकांत, शाइन टॉम चाको आणि नारायण आहेत.

Story img Loader