गेल्या अनेक दिवसांपासून ज्युनियर एनटीआरच्या ‘देवरा पार्ट १’ या सिनेमाची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. सुरुवातीला सिनेमाचे जान्हवी कपूर आणि ज्युनियर एनटीआरवर चित्रित झालेले गाणे आले, तेव्हा या गाण्यांची खूप चर्चा झाली. नंतर आलेल्या पहिल्या ट्रेलरनेही लोकांचे लक्ष वेधले. आता या सिनेमाचा दुसरा ट्रेलर आला आहे. यात समुद्रातील अ‍ॅक्शन सीन, ज्युनियर एनटीआरचा रावडी अंदाज, सैफ अली खानचा खलनायक प्रेक्षकांना बघायला मिळत आहे.

ट्रेलरमध्ये एक वाक्य येते, “डर को पार करना है तो देवों की कहानी सुनो और डर को समझना है तो ‘देवरा’ की कहानी सुनो.” म्हणजेच भीतीपासून मुक्ती हवी असेल तर देवांची कथा ऐका, आणि भीती काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर ‘देवरा’ची कथा ऐका. या डायलॉगमुळे ज्युनियर एनटीआरचं देवरा हे पात्र दमदार असणार आहे, असा अंदाज लावला जात आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

हेही वाचा…Video : ‘थलाईवा’ थिरकले ‘या’ गाण्यावर; रजनीकांत आणि संगीतकार अनिरुद्धचा डान्स व्हायरल

ज्युनियर एनटीआरचे समुद्रातील आणि जमिनीवरील फायटिंग सीन्स जबरदस्त आहेत. अभिनेता सैफ अली खानने या सिनेमात निर्दयी खलनायकाची भूमिका बजावली आहे. ट्रेलरवरून सिनेमात प्रचंड रक्तपाताचे आणि फायटिंग सीन दिसत आहेत. सैफ अली खान आणि ज्युनियर एनटीआरचे दमदार अ‍ॅक्शन फ्रेम्स, रात्रीच्या काळोखात पाण्यात असणाऱ्या होडीला लागलेली आग, या फ्रेम्स छान दिसत आहेत.

देवराच्या ट्रेलरमधील सर्वात लक्षवेधक गोष्ट म्हणजे पाण्यातील शार्क मासा आणि ज्युनियर एनटीआर यांचा सीन आहे. या सिनेमातील समुद्राच्या पाण्याखालील अ‍ॅक्शन दृश्ये कल्पनेपलीकडे जाणारी आहेत. ‘पोन्नियिन सेल्वन’मध्ये आपण जहाजांच्या सहाय्याने पाण्यातील लढाई करताना पाहिली आहे. परंतु ‘देवरा’ सिनेमात पाण्यातील लढाईचे दृश्य अधिक भव्य स्वरूपात दाखवण्यासाठी दिग्दर्शकाने नवीन कल्पनांचा वापर केला आहे, असे ट्रेलरमध्ये दिसते.

हेही वाचा…रणबीर कपूर लेक राहासाठी गातो चक्क मल्याळम अंगाई, तर आजी सोनी राजदान गातात ‘हे’ गाणं

सैफ अली खान आणि जान्हवी कपूरचे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण

‘देवरा पार्ट १’ सिनेमातून जान्हवी कपूर आणि सैफ अली खान यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. सैफ अली खानने ‘तान्हाजी’ आणि ‘आदिपुरूष’ या सिनेमांनंतर ‘देवरा पार्ट १’मध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे.  कोराताला शिवा लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात ज्युनियर एनटीआर दुहेरी भूमिकेत असून मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे, प्रकाश राज, श्रीकांत, शाइन टॉम चाको आणि नारायण मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader