‘देवमाणूस’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा लोकप्रिय आहे. या मालिकेती एसीपी दिव्या सिंगची भूमिका साकारणारी नेहा खान सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत नेहा चाहत्यांच्या संपर्कात राहते. नेहाने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सुरु असलेल्या ट्रेन्डवर आहे. आधी गाणं सुरु झाल्यावर नेहा तिची कंबर दाखवते. मात्र, इतर लोक जसे ठूमके देत ती बीट पकडतात तसं न करता नेहा तिचं पोट पुढे करते. या व्हिडीओत नेहाने कलाकार लोकांमध्ये कसे राहतात आणि घरी कसे राहतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत “मी लोकांमध्ये असली तरी अशीच राहते”, असे कॅप्शन नेहाने त्या व्हिडीओला दिले आहे. नेहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : ‘तुला लाज वाटायली हवी, तू मुस्लीम आहेस’, कामाख्या देवीचे दर्शन घेतल्याने सारा झाली ट्रोल

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Khan (@nehakhanofficial)

आणखी वाचा : ‘द कपिल शर्मा शो’मधील भूरीचा बोल्ड फोटो व्हायरल

‘देवमाणूस’ मालिका ही एक मर्डर मिस्ट्री आहे. या मालिकेत नेहा खानसोबत अस्मिता देशमुख, प्रतिक्षा जाधव, किरण गायकवाड आणि किरण डांगे मुख्य भूमिका साकारत आहेत.

Story img Loader