झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं. या मालिकेने प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं. या मालिकेतील रंजक वळण पाहताना प्रेक्षक टीव्हीसमोरून हलत नसत. या मालिकेत अजितकुमार देव ही मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले जाते. या मालिकेत विजय शिंदे ही भूमिका चांगलीच गाजली होती. विजय शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता एकनाथ गीतेने नुकतंच प्रेमाची कबुली दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ गीते याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याच्यासोबत अभिनेत्री त्रिशा कमलाकर दिसत आहे. यात त्याने तिच्यासोबत २०१८ मधील आणि २०२१ मधील असे दोन फोटो शेअर करत एक रिल व्हिडीओ तयार केला आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा : आयुष शर्माने शेअर केला लग्नातील ‘तो’ किस्सा, आमिर खान समोर येणं झालं होतं मुश्किल

एकनाथ गीते आणि त्रिशा कमलाकर हे दोघेही अनेकदा एकमेकांसोबत फोटो शेअर करत असतात. विशेष म्हणजे त्यांचे व्हिडीओही प्रचंड चर्चेत असतात. या दोघांचे अफेअर २०१८ मध्ये सुरु झाले आहे. त्या दोघांच्या नात्याला ३ वर्षे पूर्ण झाली आहे. त्यांचे व्हिडीओ आणि फोटो पाहून नेटकरी त्यांना लवकर लग्न करण्याचा सल्ला देत आहेत.

दरम्यान लवकरच ‘देवमाणूस २’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकनाथ गीते ‘देवमाणूस २’ मध्येही झळकणार असल्याचे बोललं जात आहे. पुन्हा एकदा तो डॉक्टरच्या विरोधात कशाप्रकारे त्याची भूमिका असणार, डॉक्टरला पकडून देण्यात तो कशी मदत करणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. एकनाथ गीते यांनी देवमाणूस या मालिकेतून विजय शिंदे याची भूमिका साकारली आहे. याच मालिकेतून तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. या मालिकेआधी त्याने ‘तू अशी जवळी रहा’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘जागते रहो महाराष्ट्र’, ‘श्री गुरुदेव दत्त’, ‘देव पावला’, ‘घेतला वसा टाकू नको’ अशा मालिकेतही काम केले आहे. विशेष म्हणजे त्याने ‘तांडव’ चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devmanus fame vijay shinde actor eknath gite share video with girlfriend nrp