छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेचा शेवटचा दोन तासांचा विशेष एपिसोड काल १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या भागात डिंपलच्या घरात सत्यनारायणाची पूजा ठेवण्यात आल्याचे पाहायाला मिळाले. या पुजेते बसण्यासाठी मंगल आणि बाबू यांनी डॉक्टरला विनंती केली. या विनंतीचा मान राखत देवीसिंग पूजेला बसतो. पूजेत चंदा दिसत नसल्याने देवीसिंग तिच्या शोधात बाहेर पडतो.

देवीसिंग चंदाला शोधायला बाहेर पडताच त्याला डिंपल भेटते आणि पळून जाण्याविषयीचा नवीन प्लॅन त्याला सांगते. देवीसिंग तिचा प्लॅन ऐकून रात्री आठ वाजता भेट मग आपण पळून जाऊ असं सांगतो. त्यानंतर देवीसिंग रिंकी भाभीचा जीव घेतो. एवढंच नाही तर तिच्या कडे असलेला संपूर्ण पैसा आणि दागिने घेऊन पळून जाण्याचा त्याचा प्लॅन असतो.

Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
comet Temple Tuttle, meteor shower, sky
आकाशात उल्‍कावर्षावाचे मनोहारी दृश्‍य; सज्‍ज व्‍हा…
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…

आणखी वाचा : आगळा वेगळा विवाहसोहळा! असे झाले अनिल कपूर यांच्या मुलीचे लग्न

दुसरीकडे डिंपल देवीसिंगची वाट बघून थकते आणि चंदाकडे जाऊन हा सगळा प्लॅन सांगते. देवीसिंग पळण्याची तयारी करत असताना तिथे चंदा आणि डिंपल पोहोचतात आणि चंदा देवीसिंगकडून पैसा हिसकावून त्याच्या डोक्यात दगड घालते. देवीसिंग मेला अस समजून चंदा आणि डिंपल तिथून निघून जातात. मात्र, डिंपल चंदावर वार करत तिचा जीव घेते आणि पैशांची बॅग घेऊन निघून जाते.

आणखी वाचा : ती सध्या काय करते…, जाणून घ्या कॅप्टन विक्रम बत्रांच्या प्रेयसीबद्दल

डॉक्टर बराच वेळापासून परतला नाही म्हणून गावकर त्याच्या शोधात बाहेर पडतात. गावा बाहेर त्यांना आग लागलेली दिसते. त्यात चंदाचा मृतदेह त्यांना दिसतो, तर जवळच डॉक्टरचा चष्मा, घड्याळ आणि पेन दिसतो, हे पाहता तो ही मेला असेल असे गावकऱ्यांना वाटते. दुसरीकडे वाड्यात सगळ्यागोष्टी पूर्वीप्रमाणे होत असल्याचे दिसते. एका रात्री सगळे झोपले असताना डिंपल बॅग घेऊन बाहेर पडते. तर रुग्णालयात एक माणूस घटका मोजताना दाखवला आहे. तो माणूस मरोत आणि डॉक्टर त्या माणसाला मृत असल्याचे घोषित करतो. हा माणूस दुसरा कोणी नाही तर देवीसिंग असतो. डॉक्टर बाहेर जाताच तो जीवतं होतो आणि मालिका अशा प्रकारे प्रेक्षकांचा निरोप घेते. या नंतर प्रेक्षकांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले की देवीसिंग जिवंत आहे मग आता काय होणार? डिंपलच काय? मालिकाचा शेवट पाहता लवकरच देवमाणूसचा २ भाग येणार अशी आशा प्रेक्षकांना लागली आहे.