चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही मालिका झी मराठीवर आली, आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

सध्या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि किती चतुराईने अजितकुमार त्याच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे ठरवतो. कोर्टात आर्या या निष्णात वकिलाविरुद्ध अजितकुमार आपली बाजू अत्यंत निर्भीडपणे मांडतो आणि आपण देवीसिंग नसून डॉक्टर अजितकुमार देव आहोत हे सगळ्यांना पटवून देतो. ठोस पुराव्यांअभावी कोर्ट देखील अजितकुमारची सुटका करणार अशातच मालिकेत चंदाची एण्ट्री झाली आहे.

आणखी वाचा : ‘१५ मिनिटांत बाहेर आले नाही, तर पोलिसांना फोन कर’; भारतीने सांगितला ‘कास्टिंग काऊच’चा अनुभव

आणखी वाचा : ‘आपलीच मोरी आणि ***चोरी’, सरुआजींच्या त्या संवादामुळे देवमाणूस मालिका वादात

टीव्हीवर अजितकुमारची निर्दोष सुटका होणार का? ही बातमी पाहून चंदा गोंधळात पडते. चंदाचा चेहरा पाहून अजितकुमारची शुद्ध हरपते. त्यामुळे आता लवकरच अजितकुमारचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार असल्याचे म्हटले जात आहे. ही मालिका ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेचा शेवट पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

‘देवमाणूस’ मालिकेच्या जागी १६ ऑगस्टपासून एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव ‘ती परत आलीये’ असे आहे. ही मालिका १६ ऑगस्ट पासून रात्री १०.३० वा. प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.