छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ या मालिकेने थोड्याच काळात प्रेक्षकांची मने जिंकली. ही मालिका सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलीच चर्चेत असते. यावेळी, मालिकेत सरुआजी हे पात्र आणि त्यांच्या एका संवादामुळे चर्चा रंगली आहे.
१३ जुलै रोजी देवमाणूसचा एक भाग प्रदर्शित झाला होता. या भागात सरुआजी एक म्हण बोलल्या होत्या. ‘आपलीच मोरी आणि आंघोळीला चोरी’ या आशयाची ही म्हण एका दृष्यात बोलताना दिसल्या. त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत ‘आपलीच मोरी आणि…चोरी’ या संवादात एक अश्लील अपशब्द कानावर पडत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. कोणी तरी हा व्हिडीओ डब करत त्यात अश्लील शब्द वापरला आहे. यामुळे मालिकेवर आणि वाहिनीवर टीका होत आहे.
आणखी वाचा : ‘आई कुठे काय करते’ मालिकेत होणार नव्या पात्राची एण्ट्री?
आणखी वाचा : ‘मला तैमूरची शी साफ करता येत नव्हती, मी एक परिपूर्ण आई नव्हते…’, करीनाने केला खुलासा
प्रेक्षकांनी आणि नेटकऱ्यांनी टीका केल्याचे पाहताच वाहिनीने स्पष्टीकरण दिले आहे. झी मराठी वाहिनीचे प्रमुख निलेश मयेकर म्हणाले, “हा खोडसरपणा आहे. वाहिनीचं नाव खराब करण्यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यात अश्लील शब्द वापरला गेल्याचा दाव नेटकरी करत आहेत. एक जबाबदार वाहिनी म्हणून आम्ही मालिकेच्या संवादात कोणत्याही अश्लील शब्द किंवा संवादाचा वापर केला नाही. संवादात कधीही चुकूनही कोणता अपशब्द येऊ नये; हे तपासण्यासाठी आमची एक वेगळी टीम काम करत असते. तसंच ज्यांच्या तोंडी हा संवाद आहे; त्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत; त्या अशाप्रकारचा संवाद मुळात स्वत: बोलणारच नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर जे बोललं जात आहे ते चुकीचं आहे.”