बिग बॉसच्या घरात नुकताच एक टास्क पार पडला. जो याआधीही अनेक पर्वांमध्येही ठेवण्यात आला होता. या टास्कमध्ये घरातील सदस्यांना त्यांच्या आयुष्यातील एक धक्कादायक किस्सा सांगायचा असतो. त्यानंतर घरातील इतर सदस्यांनी ओळखायचं असतं की हे गुपित कोणाशी संबंधित आहे. नुकत्याच पार पडलेल्या या टास्कमध्ये सर्वांत आधी राखी सावंतचं गुपित उघड झालं होतं. त्यानंतर आता देवोलिना भट्टाचार्जीनं तिच्या आईबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉसच्या घरात पार पडलेल्या या टास्कमध्ये देवोलिनानं तिच्या आयुष्याशी संबंधित मोठं गुपित उघड केलं. हे गुपित उघड झाल्यानंतर ती बरीच भावुक झालेली पाहायला मिळाली. देवोलिनाचं हे गुपित निशांत भट्टने वाचून दाखवलं. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, ‘मला माझ्या आईला परदेशात फिरण्यासाठी पाठवायचं होतं. पण तिची मानसिक स्थिती एवढी बिघडली होती की, तिला वाटलं की मी तिला वेड्याच्या रुग्णालयात उपाचारांसाठी पाठवत आहे.’ हे वाचल्यानंतर निशांत देवोलिनाचं नाव घेतो. त्यानं अचूक ओळखल्यामुळे तो हा टास्क जिंकतो. पण या चिठ्ठीत लिहिलेल्या दोन ओळी ऐकल्यावर घरातील सर्वच सदस्य भावुक झालेले पाहायला मिळाले.

देवोलिना पुढे या मागची पूर्ण कहाणी सांगते. ती म्हणाली, ‘ही २०१४-१५ ची घटना आहे. आई त्यावेळी मानसिक आजाराशी लढत होती. ती माझ्यासोबत मुंबईमध्ये राहत होती. मला तिला एका फॉरेन ट्रीपला पाठवायचं होतं. पण मग मला समजलं की ती खूप घाबरलेली होती. आईला वाटत होतं की, मी तिला परदेशात उपचारांसाठी पाठवत आहे. कारण त्याआधी तिच्यावर अशाप्रकारचे उपचार झाले होते. त्यामुळे तिला वाटलं की मी तिला पुन्हा एकदा वेड्यांच्या रुग्णालयात पाठवत आहे.’

बिग बॉसच्या घरातील सदस्यांशी आपल्या आयुष्यातील गुपित सांगितल्यानंतर देवोलिना खूप भावुक झालेली पाहायला मिळाली. त्यावेळी राखी सावंतनं तिला धीर दिला. याशिवाय घरातील इतर सदस्यही तिला समजावताना दिसले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devoleena bhattacharjee talk about her mother health condition at bigg boss 15 house mrj