अभिनेत्री पूजा बॅनर्जी तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा जास्त पर्सनल लाइममुळे चर्चेत असते. अभिनयाच्या दुनियेत एक संस्कारी सून आणि सकारात्मक भूमिका साकारणारी पूजा खऱ्या आयुष्यात मात्र एकदम बिनधास्त आणि ग्लॅमरस आहे. चाहते तिच्या लूक आणि अभिनयावर फिदा असतात. पण एक वेळ अशी होती की ती वयाच्या १५व्या वर्षी एका मुलासोबत पळून गेली होती.
पूजाने एका टॉक शोमध्ये तिच्या खासगी आयुष्याविषयी सांगितले आहे. वयाच्या १५व्या वर्षी ती प्रेमात पडली होती. त्या मुलासोबत ती घर सोडून पळून देखील गेली होती. त्यानंतर ती पुन्हा कधीच घरी परत गेली नाही. तिला तिच्या या निर्णयाचा पश्चाताप होत नसल्याचे तिने सांगितले. पण घरातून पळून गेल्यानंतर आई-वडिलांची प्रतिष्ठा गेली. मात्र त्यांची ती प्रतिष्ठा एखादे चांगले काम करुन परत मिळवेन, असा निर्णय पूजाने घेतला होता. त्यामुळे पूजाला मुंबईत राहून अनेक गोष्टींना समोरे जावे लागले. तिच्या या कठिण काळात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, तिची ओळख कुणाल वर्माशी झाली होती.
आणखी वाचा : शाहरुखचा मुलगा आर्यन खान करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, वेब सीरिजवर करतोय काम
पूजाने कुणालशी लग्न केले आहे. ते दोघे छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कपल आहेत. त्यांची पहिली ओळख ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’ या मालिकेच्या वेळी झाली होती. ९ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मार्च २०२०मध्ये त्यांनी कोर्टात लग्न केले. त्यानंतर नोव्हेंबर २०२१मध्ये त्यांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नात त्यांचा एक वर्षाचा मुलगा देखील होता. त्याचे नाव कृशिव आहे. रिपोर्टनुसार, पूजा लग्नाआधी प्रेग्नंट होती. ९ ऑक्टोबर २०२० कृशिवचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी कोर्टात लग्न केले.
पूजा सध्या अभिनयापासून लांब असली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांशी गप्पा मारताना दिसते. २००८मध्ये पूजाने ‘कहानी हमारे महाभारत की’ या मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’ या मालिकेत ती दिसली. पण तिच्या ‘देवों के देव… महादेव’ या मालिकेतील पार्वती या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. त्यानंतर ती ‘मां वैष्णोदेवी’ , ‘कुबूल है’, ‘सर्वगुण संपन्न’ या मालिकांमध्ये दिसली होती.