बॉलिवूडची ‘धाकड’गर्ल कंगना रणौत नेहमीच तिच्या बिनधास्त विधानांमुळे चर्चेत असते. अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर वादही होतात. नुकताच कंगनाचा ‘धाकड’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात कंगनाचा नेहमीपेक्षा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. अशात चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच कंगनानं स्वतःला एक खास गिफ्ट दिलं आहे. कंगना रणौतनं नवी कार खरेदी केली असून तिच्या कार कलेक्शनमध्ये आता आणखी एका महागड्या कारची भर पडली आहे. कंगनाचा कार खरेदी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘मर्सिडीज मेबॅक इन इंडिया’च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून कंगनाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी कंगनानं लग्जरी कार ‘मर्सिडीज मेबॅक एस ६८०’ खरेदी केली आहे. यावेळी कंगनासोबत तिचे आई- वडील, बहीण आणि कुटुंबीय उपस्थित होते. कारसोबत पोज देतानाचा कंगनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा- अमिताभ बच्चन- शाहरुख खानसह अन्य २ अभिनेत्यांच्या विरोधात खटला दाखल, वाचा नेमकं काय घडलं

या व्हिडीओमध्ये कंगना काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारसोबत उभी राहून पोज देताना दिसत आहे. मात्र कंगनानं तिच्या कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबतची माहिती दिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कंगना रणौतनं तिची पहिली कार ‘बीएमडब्ल्यू ७’ वयाच्या २१ व्या वर्षी खरेदी केली होती. ही कार तिने २००८ साली खरेदी केली होती.

आणखी वाचा- थाट कान्स फेस्टिव्हलचा पण चर्चा दीपिकाच्या कानातल्यांची; युजर म्हणाले, “कशासाठी एवढा अत्याचार…”

दरम्यान कंगना रणौतचा नव्या कारसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिचं यासाठी अभिनंदन करून शुभेच्छ दिल्या आहेत. कंगनाच्या चित्रपटाबद्दल बोलायचं तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘धाकड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटात अभिनेता अर्जुन रामपालचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

Story img Loader