एक दोन नव्हे तर तब्बल आजवर ४७ पुरस्कारांवर नाव कोरणारा ‘धग’ चित्रपट येत्या ७ मार्चला प्रदर्शित होत आहे. अभिनेत्री उषा जाधव आणि हंसराज जगताप या बालकराला या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून ‘धग’ला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. नुकत्याच या चित्रपटाची पत्रकार परिषद मुंबई येथे करण्यात आली. चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ मंडळी यावेळी उपस्थित होती.
फोटो गॅलरी: आगामी मराठी चित्रपटांवर दृष्टीक्षेप
परंपरागत सामाजिक व्यवसायाचं जोखाड दूर करण्याचा प्रयत्न करणा-या मुलाची ही कथा असून चित्रपटात उपेंद्र लिमये, उषा जाधव, नागेश भोसले, सुहासिनी देशपांडे, हसंराज जगताप, नेहा दाखिनकर आदींच्या मुख्य भूमिका आहेत. कथा-पटकथा-संवादलेखन नितिन दिक्षित यांचे आहे तर सिनेमेटोग्राफर म्हणून नागराज दिवाकर यांनी काम पहिले आहे. शिव कदम यांनी लिहिलेले गीत आदि रामचंद्र यांच्या मधुर आवाजात स्वरबद्ध करण्यात आले असून पार्श्वसंगीत सुनील कौशिक यांचे आहे.
‘धग’चे दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांनी केले असून ‘वावटळ’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला यापूर्वी गौरविण्यात आले होते. या चित्रपटाची निर्मिती विशाल पंडीत गवारे यांनी केली आहे. येत्या ७ मार्चला ‘धग’  चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा