सत् विरुद्ध असत्चा लढा, त्याला नायक-नायिकांच्या प्रेमाची फोडणी, प्रत्येक मोठय़ा प्रसंगाला अनुरूप गाणी, आयटम साँग, नायक-खलनायक यांची हाणामारी, शेवट गोड असा ठरीव फॉम्र्युला असला की उत्तम मसालापट बनतो. हिंदीतील हाच फॉम्र्युला मराठीमध्ये ‘धमक’ या चित्रपटाच्या निमित्ताने आला आहे. उत्तम लोकेशन्स, चित्रीकरणाचा उत्तम दर्जा, श्रवणीय संगीत, मुख्य कलावंतांचा चांगला अभिनय असे सारे काही असलेला ‘धमक’ हा चित्रपट भयंकर खलनायक आणि कथानकातील भरकटलेपणामुळे अपेक्षित परिणाम साधू शकत नाही. परंतु एक मसालापट म्हणून माफक रंजन करतो.
मोरेश्वर हा चित्रपटाचा नायक आहे. त्याचा मामा म्हणजे डॉ. चाचड आपली मुलगी गौरीचे लग्न मोरेश्वरसोबत लावून देतो. गौरी वयाने वाढली असली तरी अल्लडच वागते. त्यामुळे मोरेश्वर हा आपला नवरा असूनही त्याला भावोजी संबोधते. तिच्या अल्लडपणामुळे मोरेश्वर वैतागतो, घर सोडून निघून जातो. कुंदापूर या गावात डॉ. चाचड यांची कन्या गौरीवर खलनायक विक्रमदादा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच आपला नायक म्हणजे मोरेश्वर उगवतो आणि विक्रमदादाला धडा शिकवितो. कुंदापूरचा गावगुंड असलेला विक्रम आणि त्याचे साथीदार गावात उच्छाद मांडतात. त्यांना इन्स्पेक्टर मालवणकर या पोलिसाचीही साथ मिळते. मोरेश्वर आणि त्याच्या मित्रांशी मारामारीत डॉ. चाचड यांनाच हे गुंड भोसकतात. त्यानंतर गाव पेटून उठतो. विक्रमदादाला धडा शिकविण्याचा विडा उचलतो आणि त्याचे नेतृत्व आधी मोरेश्वर, मग डॉ. चाचड आणि नंतर पोलीस इन्स्पेक्टर करतो.
सरळसोट कथानक असलेला, शेवट गोड असणारा हा चित्रपट विनाकारण भरकटवण्याची किमया लेखकाने केली आहे. लेखक-दिग्दर्शक एकच असल्यामुळे हा गोंधळ उडाला आहे हे चित्रपट पाहताना जाणवतेच. उत्कृष्ट निर्मितिमूल्य, खलनायक
धमक
निर्माती – सुवर्णा बांदिवडेकर
लेखक-दिग्दर्शक – राजेंद्र बांदिवडेकर
संगीत – निर्मल कुमार
गीते – राजेश बामुगडे
कलावंत – अनिकेत विश्वासराव, गिरिजा जोशी, मोहन जोशी, अशोक समर्थ, उमा सरदेशमुख, विद्याधर जोशी, विजू खोटे, जयवंत वाडकर, अजय पाध्ये, धनंजय मांद्रेकर, मौशमी तोंडवळकर, गिरीश साळवी, शोनील शिंदे, मुमैत खान, मेघना नायडू व अन्य.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा