Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Divorce: भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि नृत्यदिग्दर्शिका धनश्री वर्मा अखेर विभक्त झाले आहेत. २०२०मध्ये लग्नबंधनात अडकलेले चहल व धनश्री यांचा २० मार्च २०२५ला घटस्फोट झाला. मुंबई फॅमिली कोर्टात दोघांच्या घटस्फोटाची सुनावणी झाली. तेव्हापासून चहल व धनश्रीच्या घटस्फोटावर जोरदार चर्चा सुरू आहे. घटस्फोटानंतर पहिल्यांदाच धनश्री वर्मा सगळ्यांसमोर आली आणि तिने घटस्फोटावर पहिली प्रतिक्रिया दिली.

मुंबईतील एका कार्यक्रमात धनश्री वर्माने हजेरी लावली होती. यावेळीच धनश्रीला पापाराझींनी घटस्फोटाविषयी विचारलं. तेव्हा तिने इशारे करत पहिली प्रतिक्रिया दिली. याचा व्हिडीओ ‘फिल्मीग्यान’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये, एक पापराझी धनश्रीला विचारतो, “मॅडम कालच्या ( घटस्फोट ) विषयी तुम्हाला काही बोलायचं आहे?” तेव्हा धनश्री हाताने इशारे करत नाही असं म्हणते. त्यानंतर ती पापाराझींना आधी गाणं ऐका असं सांगताना दिसत आहे. तेव्हा दुसरा पापाराझी म्हणतो, “गाणं सध्याच्या परिस्थितीशी जुळत आहे?” त्यावर धनश्री फक्त थंब दाखवते. धनश्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

धनश्री वर्माचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “तिच्या वेदना डोळ्यांमध्ये दिसत आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, तिचे डोळे सर्वकाही सांगून जात आहेत. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “ही खोटारडी बाई आहे.” अशाप्रकारच्या नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया धनश्रीच्या या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, घटस्फोटाच्या दिवशीच धनश्री वर्माचं नवीन गाणं प्रदर्शित झालं. याचीच सध्या दुसऱ्याबाजूला खूप चर्चा होतं आहे. ‘देखा जी देखा मैंने’ असं धनश्रीच्या गाण्याचं नाव आहे. या गाण्यामधला धनश्रीचा पती तिची फसवणूक करताना, शारिरीक हिंसा करताना आणि संशय घेताना दिसत आहे. असं काहीस धनश्रीबरोबर खऱ्या आयुष्यात घडलं आहे की काय? असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. या गाण्यामध्ये धनश्रीसह ‘पाताल लोक’ फेम इश्वाक सिंह प्रमुख भूमिकेत झळकला आहे. युट्यूबवर या गाण्याला आतापर्यंत २ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच धनश्रीचं हे नवं गाणं खूप ट्रेंड करत आहे.

Story img Loader