भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) विभक्त होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून होत आहेत. धनश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन युजवेंद्रबरोबर फोटो काढून टाकल्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांनी जोर धरला होता. अशातच नुकत्याच झालेल्या भारत-न्युझीलंड सामन्यात युजवेंद्र चहलबरोबर आरजे माहवश दिसल्यामुळे आता युजवेंद्र-धनश्री ही जोडी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. युझवेंद्र चहल आणि आरजे माहवश एकत्र दिसल्यानंतर धनश्रीनं मोठा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धनश्रीने युजवेंद्रबरोबरचे फोटो केले अन-अर्काईव्ह

धनश्रीने (Dhanashree Verma) तिच्या इन्स्टाग्रामवरून चहलबरोबरचे सर्व फोटो डिलीट केलेले किंवा अर्काइव्ह केलेले होते. शिवाय तिने इन्स्टाग्रामवरुन ‘चहल’ हे आडनावही हटवले होते. त्यानंतरच त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता धनश्रीच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो परत दिसल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. धनश्रीने (Dhanashree Verma) इन्स्टाग्रामवरील युजवेंद्रबरोबरचे सर्व फोटो अन-अर्काईव्ह केले आहेत. धनश्रीने दोघांचे हे सर्व फोटो अन-अर्काईव्ह केल्यामुळे पुन्हा एकदा नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. तसंच तिने असा निर्णय का घेतला? असे प्रश्नही उपस्थित केल जात आहेत.

युजवेंद्रचे आरजे माहवशबरोबरचे फोटो व्हायरल

भारत विरुद्ध न्युझीलंडच्या अंतिम सामन्यात युजवेंद्र (Yuzvendra Chahal) आणि आरजे माहवश (Rj Mahvash) एकत्र दिसले. युजवेंद्र भारतीय संघाचा भाग नव्हता, मात्र तो स्टेडियममध्ये बसून या सामन्याचा आनंद घेत होता. याच सामन्यात त्याच्याबरोबर आरजे माहवशही होती. हे दोघेही एकत्र बसून थट्टा-मस्करी करताना दिसले आणि याचे अनेक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दोघांचे फोटो समोर आल्यानंतर काही तासांनी धनश्रीने ‘स्त्रियांना दोषी ठरवणे ही एक फॅशन राहिलेली आहे’ अशी पोस्ट शेअर केली.

धनश्री आणि युजवेंद्र पुन्हा एकत्र येणार?

दरम्यान, धनश्रीच्या (Dhanashree Verma) इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे युजवेंद्रबरोबरचे फोटो दिसत असले तरी, चहलच्या अकाउंटवर मात्र तिच्याबरोबरचे कोणताही फोटो किंवा व्हिडीओ अद्याप दिसत नाहीत. तसंच दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या दोघांमध्ये नक्की चाललंय तरी काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तसंच या दोघांमध्ये भविष्यात नेमकं काय होणार? याची सर्वांना उत्सुकताही लागून राहिली आहे.