सध्या सोशल मीडियावर ‘बचपन का प्यार’ या गाण्याने चांगलाच धुमाकुळ घातला आहे. बॉलिवूडपासून मराठी कलाकार देखील ‘बचपन का प्यार’ वर रील शेअर करताना दिसून येत आहे. सहदेव दिर्दो या मुलाच्या या गाण्याने अनेकांना भुरळ घातली आहे. यातच आता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असलेली वहिनीसाहेब म्हणजेच धनश्री काडगावंकरने देखील ‘बचपन का प्यार’वर धमाल व्हिडीओ शेअऱ केलाय.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून वहिनीसाहेब ही भूमिका साकारत धनश्री घराघरात पोहचली. दिर्घ काळ या मालिकेत काम केल्यानंतर आई होणार असल्याने धनश्रीने मालिकेतून ब्रेक घेतला. असं असलं तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते. धनश्रीने मुलाल जन्म दिला असून त्याचं नाव कबीर असं आहे. नुकताच धनश्रीने तिच्या लाडक्या लेकासोबत ‘बचपन का प्यार’ गाण्यावर धमाल व्हिडीओ शेअर केलाय. यात धनश्रीचा मुलगा कबीर खूपच गोड दिसतोय. कॅप्शनमध्ये , “बचपन का प्यार…हे तर करायचंच होतं” असं तिने लिहिलंय.
View this post on Instagram
हे देखील वाचा: महाराष्ट्रातील शाळांमधून खेळाडू घडवा; नीरजच्या यशानंतर मराठी अभिनेत्याची इच्छा
धनश्रीच्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी पसंती दिलीय. तसचं अनेक चाहत्यांसोबतच तिच्या मित्र मैत्रिणींनी धनश्रीच्या मुलाचं कौतुक केलंय. धनश्रीचा मुलगा कबीर खूपच क्यूट असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. “मॅम नजर काढा त्याची” असं म्हणत एका युजरने कबीरचं कौतुक केलंय.