राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता धनुष आणि कमल हसनची धाकटी मुलगी अक्षरा सोमवारी (२४ फेब्रुवारी) आर. बाल्की यांच्या आगामी चित्रपटाच्या मुंबईतील चित्रीकरणाच्या ठिकाणी आढळून आले. २०१३ साली ‘रांझणा’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केलेल्या तमिळ सुपरस्टार धनुषचा हा दुसरा बॉलिवूडपट आहे. अद्याप या चित्रपटाचे नामकरण करण्यात आलेले नाही. यावेळी बालकीची पत्नी आणि ‘इंग्लिश विंग्लिशची’ दिग्दर्शिका गौरी शिंदे चित्रपट निर्माता करण जोहरबरोबर चित्रीकरणाच्या ठिकाणी उपस्थित होती. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन देखील काम करणार आहेत. ‘चिनी कम’ आणि ‘पा’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा ते बालकीबरोबर काम करत आहेत. चित्रपटाला संगीत इलयाराजा यांचे असून, पी. सी. श्रीराम यांचे छायांकन आहे. बॉलिवूडपटांकडे आपला मोर्चा वळवलेल्या धनुषकडे दिग्दर्शक आनंद राय यांचा सुध्दा एक चित्रपट आहे.
आर. बालकी यांच्या आगामी चित्रपटात धनुष आणि अक्षरा हसन
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता धनुष आणि कमल हसनची धाकटी मुलगी अक्षरा सोमवारी (२४ फेब्रुवारी) आर. बाल्की यांच्या आगामी चित्रपटाच्या मुंबईतील चित्रीकरणाच्या ठिकाणी आढळून आले.
First published on: 25-02-2014 at 01:26 IST
TOPICSधनुषDhanushबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 2 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhanush akshara haasan shoot for balkis film