राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता धनुष आणि कमल हसनची धाकटी मुलगी अक्षरा सोमवारी (२४ फेब्रुवारी) आर. बाल्की यांच्या आगामी चित्रपटाच्या मुंबईतील चित्रीकरणाच्या ठिकाणी आढळून आले. २०१३ साली ‘रांझणा’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केलेल्या तमिळ सुपरस्टार धनुषचा हा दुसरा बॉलिवूडपट आहे. अद्याप या चित्रपटाचे नामकरण करण्यात आलेले नाही. यावेळी बालकीची पत्नी आणि ‘इंग्लिश विंग्लिशची’ दिग्दर्शिका गौरी शिंदे चित्रपट निर्माता करण जोहरबरोबर चित्रीकरणाच्या ठिकाणी उपस्थित होती. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन देखील काम करणार आहेत. ‘चिनी कम’ आणि ‘पा’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा ते बालकीबरोबर काम करत आहेत. चित्रपटाला संगीत इलयाराजा यांचे असून, पी. सी. श्रीराम यांचे छायांकन आहे. बॉलिवूडपटांकडे आपला मोर्चा वळवलेल्या धनुषकडे दिग्दर्शक आनंद राय यांचा सुध्दा एक चित्रपट आहे.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा