दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या वृत्तानं सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धनुष आणि ऐश्वर्यानं ते दोघंही विभक्त होत असल्याची माहिती दिली. लग्नाच्या १८ वर्षांनंतर या दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय का घेतला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण त्यांच्या घटस्फोटानंतर त्यांचे काही जुने व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. अशाच एका व्हिडीओमध्ये धनुषचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये धनुष त्याची पत्नी ऐश्वर्यासाठी गाणं गाताना दिसत आहे. धनुष- ऐश्वर्याचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून त्यांचे चाहते मात्र भावुक झाले आहेत. या व्हिडीओमध्ये धनुष, त्याचे सासरे रजनीकांत यांच्या ‘पेट्टा’ चित्रपटातील ‘Ilamai Thirumbuthae’ हे गाणं गाताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये पत्नी ऐश्वर्यासाठी जे त्याचं प्रेम दिसत आहे. ते खरंच सर्वांना भावुक करणारं आहे. धनुषचा हा रोमँटिक अंदाज पाहून ऐश्वर्या चक्क लाजताना दिसत आहे.

Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Video : an old couple dance on angaro ka ambar sa song in pushpa movie
Video : क्या बात! आज्जी आजोबांनी ‘पुष्पा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “जोडी असावी तर अशी..”
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video

दरम्यान आपल्या घटस्फोटाची माहिती देताना धनुषनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. धनुषनं लिहिलं, ‘मित्र, पती-पत्नी, पालक आणि एकमेकांचे शुभचिंतक म्हणून १८ वर्षं सोबत राहिलो. आज आम्ही एका अशा ठिकाणी उभे आहोत, जिथे आमचे मार्ग वेगळे आहेत. ऐश्वर्या आणि मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्या निर्णयाचा स्वीकार करावा’ याशिवाय अशाच पद्धतीची पोस्ट ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील केली आहे.

धनुषच्या कामाबद्दल बोलायचं तर अलिकडच्या काळात त्याचा ‘अतरंगी रे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यात त्याच्यासोबत अक्षय कुमार आणि सारा अली खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्याआधी तो ‘रांझणा’ या बॉलिवूड चित्रपटात दिसला होता. आगामी काळात त्याचा ‘Maaran’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो ‘Vaathi’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

Story img Loader