आज अभिनेता धनुषचा वाढदिवस. ३१ वर्षीय धनुशने रविवारी रात्री आपले कुटूंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराबरोबर वाढदिवस साजरा केला. सध्या आर. बाल्की यांच्या शमिताभ चित्रपटाच्या मुंबईतील चित्रीकरणात व्यस्त असलेला धनुष आपल्या कुटुंबियांसमवेत हा आनंदाचा क्षण व्यतित करण्यासाठी घरी परतला. त्याच्या जवळच्या सूत्रांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, आपले आई-वडिल आणि पत्नी ऐश्वर्याबरोबर वाढदिवस साजरा करण्यासाठी धनुष घरी परतला. रविवारी रात्री त्याच्या पत्नीने त्याच्यासाठी एका पार्टीचे आयोजन करून त्याला सुखद धक्का दिला. यावेळी चित्रपटसृष्टीतील त्याचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. तमिळ अभिनेता सिलांबरासन (सिंबु), सूर्या, अमला पॉल आणि सुरभी या पार्टीला उपस्थित होते. धनुषचा भाऊ सेल्वराघवन आणि वहिनी गीतांजली सेल्वराघवनसुद्धा या पार्टीला उपस्थित होते.
२६ किलोचा अंडाविरहीत केक कापून धनुषने अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘वेल्ला इल्ला पट्टाथरी’ चित्रपटाच्या यशाचा आनंददेखील साजरा केल्याचे सूत्रांकडून समजले.
प्रतिक्रिया नोंदविण्याच्या सुविधेचा वापर करून आपण प्रसिद्ध ‘कोलावरी डी’ गाण्याचा गायक आणि अभिनेता धनुषला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.