तमिळ सुपरस्टार आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता धुनष त्याच्या दुसऱ्या बॉलिवूडपटाच्या चित्रीकरणासाठी गोव्याला रवाना झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. बाल्की करणार आहेत. ‘रांझना’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण करणारा धनुष या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन आणि कमल हसनची मुलगी अक्षराबरोबर काम करणार आहे. आपल्या या नव्या बॉलिवूडपटाबाबतचा संदेश त्याने टि्वटरवर पोस्ट केला आहे.
En route 2 goa for Balki s film shoot and VIP background score. #soupboys pic.twitter.com/joylMwlQTu
— Dhanush (@dhanushkraja) April 18, 2014
याआधी ‘मरियन’ ह्या तमिळ चित्रपटात दिसलेला धनुष अमिताभ बच्चनबरोबर काम करण्यास अतिशय उत्सुक आहे. अमिताभ बच्चन यांनी ‘रांझना’ चित्रपटातील धनुषच्या कामाचे कौतुक केले होते. अद्याप नामकरण न झालेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणास या आठवड्याच्या अखेरीस सुरुवात होईल. चित्रपटाचे संगीत तमिळ संगीतकार इलयाराजा यांचे आहे, तर सिनेमेटोग्राफी पी. सी. श्रीराम यांची आहे.