दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि ऐश्वर्या काही महिन्यांपूर्वीच वेगळे झाले आहेत. धनुषनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून पत्नी ऐश्वर्यापासून वेगळं होत असल्याची माहिती दिली होती. या दोघांच्या नात्याची त्यावेळी बरीच चर्चा देखील झाली होती. एवढंच नाही तर दोघांच्याही चाहत्यांनाही धक्का बसला होता. मात्र धनुष आणि ऐश्वर्या यांच्या अद्याप मैत्री कायम आहे. हे त्यानं ट्विटरवर नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमुळे समोर आलं आहे. धनुषनं त्याची पूर्वश्रमीची पत्नी ऐश्वर्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धनुषपासून वेगळं झाल्यानंतर ऐश्वर्या रजनीकांत तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. नुकतंच तिचं नवं गाणं ‘पयानी’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्याचं सोशल मीडियावर बरंच कौतुक होताना दिसत आहे. अशात धनुषनं देखील या गाण्यावर प्रतिक्रिया देत ऐश्वर्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये धनुषनं लिहिलं, ‘माझी मैत्रीण ऐश्वर्या तुला तुझे नवे गाणे ‘पयानी’साठी खूप शुभेच्छा’

आणखी वाचा- कथित गर्लफ्रेंड सबा आझादच्या फोटोवर हृतिक रोशनच्या आईची कमेंट, म्हणाल्या…

धनुषच्या या ट्वीटवर ऐश्वर्यानंही त्याला प्रतिक्रिया दिली आहे. धनुषचं ट्वीट रिट्विट करत ऐश्वर्यानं लिहिलं, ‘धन्यवाद धनुष, Godspeed.’ दरम्यानं वेगळं झाल्यानंतर या दोघांमध्ये असलेल्या या मैत्रीसाठी मात्र दोघांचेही चाहते खूप खूश असल्याचं पाहायला मिळत आहेत. अनेकांनी या ट्वीटवर कमेंट करत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा- “विवेक अग्निहोत्रींना काश्मिरी पंडितांची काळजी असेल तर…”, ‘द कश्मीर फाइल्स’वर करणी सेनेचं विधान चर्चेत

दरम्यान ऐश्वर्या आणि धनुष यांनी एक सलग्न स्टेटमेंट सोशल मीडियावर शेअर करत आपण वेगळं होत असल्याची माहिती दिली होती. लग्नानंतर १८ वर्षांनी या दोघांनी या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. अद्याप दोघांचा कायदेशीररित्या घटस्फोट झालेला नाही. मात्र त्यांच्यातील पती-पत्नीचं नातं संपल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. मात्र धनुषपासून वेगळं झाल्यानंतरही ऐश्वर्यानं सोशल मीडियावरून तिच्या नावातील धनुषचं नाव कायम ठेवलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhanush wrote special post for ex wife aishwarya rajanikanth after her new song release mrj