सध्या सगळीकडेच ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता प्रसाद ओक या चित्रपटामध्ये दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण गेल्या बऱ्याच काळापासून दिग्दर्शन करत असलेल्या प्रसादला आनंद दिघे यांची भूमिका साकारण्यासाठी ऑफर कशी मिळाली आणि हा संपूर्ण योग कसा जुळून आला या विषयी त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसादने नुकतीच लोकसत्ता डॉट कॉमला मुलाखत दिली यावेळी त्याने ही मुलाखत कशी मिळाली याचा खुलासा केला आहे. “एक दिवस अचानक मला मंगेशने फोन केला आणि म्हणाला मोकळा आहेस का? मी म्हणालो हो का काय झालं? तर तो म्हणाला एक लूक टेस्ट करायची आहे. ठाण्यात येऊ शकतोस का? मी म्हणालो येतो. मंगेश माझा खूप जूना मित्र आहे. जवळपास १५ ते २० वर्षांपासूनचा मित्र आहे. कसली लूक टेस्ट आहे असा प्रश्न मी त्याला विचारला तर त्याने येना तू सांगतो असे उत्तर दिले”, असे प्रसाद म्हणाला.

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

आणखी वाचा : “दिघे साहेब गेले तेव्हा अख्खं ठाणं जळत होतं अन्…”, हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

पुढे प्रसाद म्हणाला, “मी ठाण्यात गेलो. तिथे विद्याधरे भट्टे होते ज्यांनी हा लूक डिझाइन केला आहे. त्यांनी मेकअप सुरु केला, दाढी-मिशी लावली. तेव्हा मला असं वाटलं की हा एक ऐतिहासीक रोल असेल पण जेव्हा त्यांनी विग काढला तेव्हा मला जाणवलं की हा ऐतिहासीक काळातील विग नाही तर आजच्या काळातला विग आहे. तेव्हा मी गोंधळलो आणि मी मंगेशला विचारलं की कसली लूक टेस्ट आहे? काय करतोय आपण मला सांग. तेव्हा तो म्हणाली अरे काही नाही मी धर्मवीर नावाचा चित्रपट बनवतोय तर त्याच्यासाठी लूक टेस्ट आहे. त्यावर मी म्हणालो धर्मवीर म्हणजे आनंद दिघे साहेब. त्यावर तो म्हणाला हो. मग माझी लूक टेस्ट कशासाठी हा प्रश्न विचारला तर तो म्हणाला आनंद दिघे साहेबांच्या भूमिकेसाठी. मी उडालोच खूर्चीतून आणि म्हणालो तू काय वेडा आहेस का मंगेश, मला अचानक असं सहज बोलावलं. त्यावर मंगेश म्हणाला, जो पर्यंत लूक टेस्ट फायनल होतं नाही तो पर्यंत तुला काही टेन्शन घेण्याची गरज नाही. मला वेळ पाहिजे असे मी म्हणताच मंगेश म्हणाला, तू जर फायनल झालास तर तुला वेळ देऊ आपण. आज फक्त तू त्यांच्या जवळपास दिसतोयस का हे बघायचं आहे. लूक टेस्टमध्ये त्यांनी फोटो आणि व्हिडीओ काढले. त्यात त्यांना काही त्रृटी जाणवल्या. पण विद्याधरे भट्टे काकांचं असं म्हणणं होतं की, जेवढ्या आता पर्यंत लूक टेस्ट केल्यात त्यात मला सगळ्यात जवळचा प्रसाद वाटला.”

आणखी वाचा : “मोदींना खूश करण्याकरता जीवाचं रान करणाऱ्या राज ठाकरेंनी…”, दीपाली सय्यद यांचे ट्वीट चर्चेत

पुढे सात-आठ दिवसानंतर करण्यात आलेल्या लूक टेस्ट विषयी प्रसाद म्हणाला, “त्या दिवसाची लूक टेस्ट फारच अप्रतिम झाली असं मी नाही तर ते सगळे म्हणाले. दिघे साहेबांसोबत बराचवेळ असलेली शशी जाधव नावाची एक व्यक्ती मंगेशला भेटण्यासाठी तिथे पोहोचली होती. ते मंगेश आणि प्रविणसाठी जेवण घेऊन तिथे आले होते. त्याला तर माहितही नव्हत की कसला मेकअप सुरु आहे. तो जेव्हा हॉलमध्ये आला तेव्हाच मी माझ्या मेकअप रूममधून बाहेर आलो. तर मला पाहून तो दोन फूट मागे गेला अन् रडायला लागला मग हे दिघे साहेब आहेत असं म्हणून लागला. तेव्हा ती आमच्यासाठी पावती होती. त्यानंतर त्या दिवसाचे फोटो आणि व्हिडीओ एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले. तेव्हा शिंदे साहेब म्हणाले की प्रसाद ओक आहे दिघे साहेब. त्याला तुम्ही फायनल करा तुम्ही वेळ घालवू नका.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharamaveer anand dighe prasad oak on his role dcp