‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारख्या गाजलेल्या आणि बहुचर्चित आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटानंतर प्रविण विठ्ठल तरडे हे एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेले, ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचं नुकतचं गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात बाळासाहेबांच्या भूमिकेची झलक दिसली.पण सगळ्यांना प्रश्न आहे की बाळासाहेबांची भूमिका कोण साकारणार?

महाराष्ट्राला गुरू-शिष्य परंपरेचा मोठा इतिहास आहे. सामाजिक-राजकिय क्षेत्रातही असे अनेक नेते होऊन गेलेत ज्यांचं शिष्यत्व पत्करून आजही अनेकजण त्यांच्या विचारांच्या वाटेवर चालतात. राजकीय क्षेत्रातील गुरू-शिष्याची आदर्शवत ठरावी अशीच एक जोडी या महाराष्ट्राने बघितली आहे. ही जोडी म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे ! त्यांच्या आयुष्यात जे स्थान छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं, जी भक्ती दुर्गामतेसाठी होती अगदी तशीच श्रद्धा बाळासाहेबांवर होती. या चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका अभिनेता मकरंद पाथ्ये साकारत आहे. ‘गुरुपौर्णिमा’ या गाण्यातून मकरंदचा बाळासाहेबांचा लूक सगळ्यांसमोर आला आहे.

आणखी वाचा : योगा शिबिरात भेट ते सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न, नवनीत राणा यांची ‘प्यार वाली लव्हस्टोरी’

आणखी वाचा : प्रियांका चोप्राने मुलीला दिले भारतीय नाव!

‘गुरुपौर्णिमा हा गुरूचा नाही तर शिष्याचा दिवस आहे’ असे आनंद दिघे मानायचे. या दिवशी गुरुची सेवा केली की पदरी पुण्य पडतं अशी त्यांची श्रद्धा होती. आपल्या गुरूंचे चरणकमल धुण्याचा आणि पाद्यपूजा करण्याचा प्रसंग या गाण्यातून रेखाटला आहे. आनंद दिघे यांची जी श्रद्धा बाळासाहेबांप्रति होती अगदी तशीच श्रद्धा आनंद दिघे साहेबांबद्दल ठेवणारे शिष्य म्हणजे एकनाथ शिंदे. त्यांच्या या गुरू शिष्य नात्याची अनोखी गोष्ट या चित्रपटातून आणि या गाण्यातून उलगडणार आहे.

आणखी वाचा : ऐश्वर्या रायपासून काजोलपर्यंत, आलिया भट्टच्या आधी ‘या’ ७ अभिनेत्रींनी दिली लेहेंग्या ऐवजी साडीला पसंती

आणखी वाचा : करीनाचा लाडका जेह चालवतो BMW कार, गाडीची किंमत ऐकलीत का?

या गाण्यातून प्रथमच बाळासाहेबांच्या या महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेची झलक प्रेक्षकांना बघायला मिळाली. प्रसाद ओक, क्षितिश दाते यांच्याप्रमाणेच बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मकरंद पाध्ये यांच्या लुकवरही रंगभूषाकार विद्याधर बट्टे यांनी घेतलेली मेहनत दिसून येते. झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती आणि प्रविण तरडे यांचं लेखन- दिग्दर्शन असलेला ‘धर्मवीर’ हा चित्रपट येत्या १३ मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader