भारतीय चित्रपटाच्या इतिहासात आशय, विषय, तंत्र अशा सगळ्याच बाबतीत भव्य दिव्य ठरलेला अनेक विक्रम मोडणारा चित्रपट म्हणजे ‘बाहुबली’ आहे. ‘बाहुबली’ने केवळ दाक्षिणात्यच नाही तर एकूणच भारतीय चित्रपटाची परिभाषा बदलली. या सगळ्याच श्रेय हे त्या चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांना जाते. फक्त बाहुबलीच नाही तर परदेशात सध्या धुमाकूळ घालणारा ‘आरआरआर’ हा चित्रपट देखील राजामौली यांनी दिग्दर्शित केला आहे. तर राजामौली यांना भुरळ घातलीये आपल्या मराठमोळ्या ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ चित्रपटाने! आज सकाळी धर्मवीरचे दिग्दर्शक प्रविण तरडे, निर्माते मंगेश देसाई आणि झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी यांनी राजामौली यांची भेट घेतली. यावेळी चित्रपटाचा टीझर त्यांना प्रचंड आवडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजामौली यांच्यासोबत झालेल्या या भेटीने दिग्दर्शक प्रविण तरडे अतिशय भारावून गेले होते. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “राजामौली सरांना मी कायमच माझा आदर्श मानत आलेलो आहे. त्यांनी दाक्षिणात्य चित्रपट ज्या भव्य दिव्यतेने जगभरात पोहचवला तसंच काही तरी भरीव आपल्याला मराठी चित्रपटाबद्दल करता यावं हीच इच्छा कायम मनात आहे. त्यांना भेटण्याची कायमच इच्छा होती आज धर्मवीरच्या निमित्ताने ती पूर्ण झाली. त्यांनी आमच्याशी अतिशय सहृदयतेने संवाद साधला. काही अनुभव, किस्से आमच्याशी शेअर केले. त्यांच्या या भेटीतून आपला मराठी सिनेमा जगाचा सिनेमा बनवण्यासाठीची एक नवी ऊर्जा आणि प्रेरणा आम्हाला मिळाली.”

आणखी वाचा : ट्विंकल खन्नाने मनीष मल्होत्राच्या फोनवरून केला होता ‘असा’ अश्लील मेसेज, पण जेव्हा समोरच्या व्यक्तीने…

आणखी वाचा : या २ राशीचे लोक असतात खूप भाग्यवान, ‘मंगळ’ ग्रहाच्या कृपेने जीवनात होतात यशस्वी

तर निर्माते मंगेश देसाई म्हणाले की, “जेव्हा बाहुबली चित्रपट बघितला होता तेव्हा कधीच विचार केला नव्हता की बाहुबलीच्या जन्मदात्याला भेटण्याची संधी मिळेल. पण आज तो योग जुळून आला. त्यांना भेटण्यापूर्वी मनात थोडी धाकधूक होती, थोडं दडपण होतं. पण ते जेव्हा समोर आले, आमच्याशी बोलले तेव्हा हे दडपण आपोआप गळून पडलं. चेहऱ्यावर किंवा वागण्यात कसलाही बडेजाव नसलेलं, अतिशय साधं व्यक्तिमत्त्व म्हणजे राजामौली सर हे या भेटीत जाणवलं.”

आणखी वाचा : पतीच्या निधनानंतर स्विमिंग पूलमध्ये मित्रासोबत दिसली मंदिरा बेदी, सोशल मीडियावर ट्रोल होताच केली ‘ही’ गोष्ट

झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणाले की, “चित्रपटाच्या बाबतीत दूरदृष्टी कशी असावी ? कथेच्या बाबतीत व्हिजन कसं असावं? या प्रश्नांचं उत्तर म्हणजे राजामौली सर. त्यांच्या ‘मख्खी’, ‘मगधीरा’, ‘बाहुबली’ ते आता सर्वत्र चर्चेत असलेल्या ‘आरआरआर’ या चित्रपटांचा मी चाहता आहे. प्रादेशिक भाषेतला चित्रपट केवळ त्या भाषांपुरताच मर्यादित न राहता तो जागतिक चित्रपट कसा बनू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे. आज या भेटीतून या व्यक्तीचं चित्रपटाबद्दलचं प्रेम, या माध्यमावर असलेली हुकूमत हे त्यांच्याशी झालेल्या संवादातून जाणवलं. चित्रपटाचा टिझर त्यांना दाखवला असता ते म्हणाले की ही भाषा जरी मला कळत नसली तरी चित्रपटाचा लुक मला आवडला. कलाकारांचा अभिनय, पार्श्वसंगीत सर्वच उत्तम जमून आलंय. त्यांनी दिलेली ही दाद, ही प्रतिक्रिया आमच्यासाठी फारच मोलाची आहे. त्यांच्याकडून अतिशय सकारात्मक अशी ऊर्जा आम्हांला मिळाली आहे.”

आणखी वाचा : “मी एका कपलसोबत ‘Throuple Relationship’मध्ये होते”; सायशा शिंदेने केला धक्कादायक खुलासा

झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सने धर्मवीरची निर्मिती केली. तर चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडे यांनी केलं आहे. हा चिपट १३ मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharmaveers team meet the s s rajamauli director says he loves the teaser dcp