बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र चित्रपटसृष्टीपासून लांब असले, तरी ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. धर्मेंद्र हे सोशल मीडियावर फारच सक्रिय आहे. सोशल मीडियावर त्यांचा चाहतावर्गही फार मोठा आहे. नुकतंच धर्मेंद्र हे त्यांच्या फार्महाऊसवर वेळ घालवताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते त्यांच्या फार्महाऊसमधील अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच धर्मेंद्र यांनी त्यांचा आणखी एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र हे सायकल चालवताना दिसत आहेत. या सायकलच्या चक्राला एक गिरणी जोडलेली दिसत आहे. यात धान्य ठेवण्यात आले असून ते याद्वारे दळत असल्याचे दिसत आहे. धर्मेंद्र स्वत: हे धान्य दळताना दिसत आहे. धर्मेंद्र यांनी हा व्हिडीओ शेअर करताना त्याला मजेशीर कॅप्शनही दिले आहे. ते म्हणाले, “सायकलिंग, सायकलिंग, सायकलिंग आणि चक्की पिसिंग, पिसिंग अँड पिसिंग(दळणे)”. दरम्यान धर्मेंद्र यांनी दिलेले कॅप्शन हे त्यांच्या शोले चित्रपटातील प्रसिद्ध चक्की दळण्याच्या सीनमधील आहे.
धर्मेंद्र हे सध्या करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. या चित्रपटाद्वारे धर्मेंद्र दीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्याशिवाय या चित्रपटात शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटानंतर धर्मेंद्र लवकरच त्यांच्या होम प्रॉडक्शनच्या ‘अपने 2’ चित्रपटाचे शूटिंग करणार आहेत. यामध्ये सनी आणि बॉबीशिवाय करण देओलही पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे.
“हो, मी तिला…”, रणबीर कपूरने सांगितले दीपिकासोबतच्या ब्रेकअपचे धक्कादायक कारण
धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र ही जोडी ७० च्या दशकातील सुपरहिट जोडी म्हणून ओळखली जाते. आजवर त्यांनी अनेक लोकप्रिय आणि गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यात ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘दिल्लगी’ आणि ‘ड्रिम गर्ल’ अशा काही चित्रपटांचा समावेश आहे.