मद्यपानाच्या वाईट सवयीमुळे कारकीर्दीत खूप मोठे नुकसान झाल्याचे बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेता धर्मेंद्र यांनी म्हटले आहे.
चित्रपट क्षेत्रात पुन्हा सक्रिय झालेले आणि ‘यमला पगला दिवाना-2’ चित्रपटात बॉबी आणि सनी या आपल्या मुलांसोबत काम करणारे ७७ वर्षीय धर्मेंद्र यांचे म्हणणे आहे की, आता त्यांना चित्रपट निर्मितीची प्रक्रिया समजली आहे. त्या या प्रक्रियेकडे अतिशय गांभीर्याने बघताहेत.
‘यमला पगला दिवाना-2’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी नवी दिल्लीत आलेले धर्मेंद्र म्हणाले, आता मी मद्यपान सोडले असून, दारू पिण्याच्या वाईट सवयीमुळे मी माझी अभिनयाची कारकीर्द नष्ट केली. आता मी मानवतावादावर विश्वास ठेवतो. मी आणि माझ्या मुलांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलीये. वयोमानानुसार आपल्या ढासळत्या प्रकृतिमुळे धर्मेंद्र यांनी २०११ पासून मद्यपान करणे बंद केले आहे. त्यांचा ‘यमला पगला दिवाना-2’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतो आहे.
मद्यपानामुळे स्वतःचे नुकसान झाले – धर्मेंद्र
मद्यपानाच्या वाईट सवयीमुळे कारकीर्दीत खूप मोठे नुकसान झाल्याचे बॉलिवूडचा 'ही-मॅन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेता धर्मेंद्र यांनी म्हटले आहे.
First published on: 04-06-2013 at 12:11 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharmendra i destroyed myself as an actor with my drinking habit