गाणं म्हणजे सुरेल, सुमधूर आवाजाचा संगम असा जो काही आपला पूर्वापार चालत आलेला समज आहे, तो आपल्या ‘आवजा’ने खोडून काढणारी ढिंच्यॅक पूजा पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आली आहे. ढिंच्यॅक पूजाने ‘करोना’वर गाणं गायलं असून तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती रॅप करताना दिसतेय. रॅपच्या माध्यमातून ती ‘करोना’बाबत जनजागृती करताना दिसतेय.
‘करोना करोना, काम ये करोना, दुआ ये करना, किसी को ये हो ना’ असे तिच्या रॅपसाँगचे बोल आहेत. या व्हिडीओत ढिंच्यॅक पूजाच्या मागे उभे असलेल्यांनी तोंडाला मास्क लावल्याचं पाहायला मिळत आहे. हात स्वच्छ धुण्यापासून, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा असे काही संदेश ती या रॅपच्या माध्यमातून देताना दिसतेय.
तुम्हीच पाहा पूजाचे हे नवीन गाणे…
Me after listening #Dhinchakpooja ‘s corona Song
pic.twitter.com/cXpIe2xxFI— PUJA TIWARY. (@PUJATIWARY7) March 19, 2020
When you survived after having the #Corona virus but later died due to listening #Dhinchakpooja single on corona virus pic.twitter.com/Vlu5AzUgZH
— Achhaya Pathak (@frozen_parantha) March 19, 2020
या व्हिडीओला एका दिवसांत अडीच लाखहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर हा तिचा व्हिडीओ व्हायरल होत असला तरी नेटकऱ्यांनी तिचं गाणं ऐकून डोक्याला हात लावला आहे. ढिंच्यॅक पूजा तिच्या (अ)श्रवणीय आवाजामुळे प्रकाशझोतात आली. ‘सेल्फी मैने लेली आज’, ‘दिलो का स्कूटर’ आणि ‘आफ्रीन फातिमा बेवफा है’ ही तिची गाणी खूप गाजली होती.