हिंदी चित्रपट सृष्टीत सध्या शेकडो कोटी रुपयांची उड्डाणे सुरू असून चित्रपटांनी १०० तसेच २०० कोटींचा गल्ला गाठण्याची मर्यादा आता ओलांडत थेट ५०० कोटींची झेप घेतली आहे. अ‍ॅक्शनपट म्हणून ओळखला जाणारा आणि अमिर खान याची प्रमुख भूमिका असलेल्या धूम -३ ने तब्बल ५०० कोटी रुपयांची कमाई करून हिंदूी चित्रपट सृष्टीतील विक्रम केला आहे.
यशराज बॅनरखाली निर्मिती झालेल्या धूम-३ मध्ये अमिर खानसह, अभिषेक बच्चन, उदय चोप्रा, कतरिना कैफ आदी कलाकार आहेत.तर आदित्य चोप्रा यांनी या चित्रपटाचे चिग्दर्शन केले आहे.  
या चित्रपटाने सुरूवातीपासूनच कमाईचे विक्रम मोडण्यास सुरूवात केली. आतापर्यंत ५०० कोटींचा गल्ला जमा करताना स्वदेशात ३५१.२९ कोटी तर परदेशात १५०.०६ कोटी रुपयांची कमाई केली.
‘धूम’ मालिकेतील पहिल्या चित्रपटात जॉन अब्राहम तर दुसऱ्या भागात हृतिक रोशन याने नकारात्मक भूमिका केली होती. तर धूमच्या तिसऱ्या भागात अमिर खानने आपल्या अदाकारिने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. सुरूवातीपासूनच आपल्याबाबत अपेक्षा वाढविणारा धूम उत्पन्नाचे विक्रम मोडील,असा जाणकारांचा होरा होता.
दरम्यान, हिंदी चित्रपट सृष्टीत आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम  शाहरूख खान आणि दिपीका पदुकोण यांच्या  ‘चेन्नई एक्सप्रेस’चा होता. तो विक्रम आता धूम -३ ने टाकून नवीन इतिहास घडवला आहे. धूम -३ चा हा नवा विक्रम कोणता हिंदी चित्रपट मोडणार हे पाहणे मनोरंजक ठरेल.

Story img Loader