बहूचर्चित ‘धूम-३’ प्रदर्शित झाल्यापासून देशभरातील सर्वच बॉक्स-ऑफिसवर धूमधडाका सुरू आहेच तसेच पाकिस्तानमध्येही धूम-३ने आतापर्यंतचे विक्रम मोडीत काढले आहेत.
पाकिस्तानमधील चित्रपटगृहांत धूम-३चे दिवसातून लागोपाठ चक्क पाच वेळा स्क्रिनिंग होत आहे. यावरूनच पाकिस्तानमधील धूम-३चा क्रेझ लक्षात घेण्यासारखा आहे. पाकिस्तानची राजधानी कराचीमधील एकूण ५६ चित्रपटगृहांमध्ये धूम-३ने पहिल्याच दिवशी तब्बल २० कोटींची कमाई केली आणि तेथील याआधीच्या विक्रमाला मागे टाकले आहे. गेल्याच महिन्यात पाकिस्तानात ‘वार’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ११.४ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर आता धूम-३ने जवळपास साडेआठ कोटींच्या फरकाने पुढचे पाऊन टाकत नवा विक्रम केला. मुख्यम्हणजे, एकाच दिवशी लागोपाठ एकाच चित्रपटाचे पाच शो दाखविले जाणे हे ‘पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री’ने आजवर अनुभवलेले नाही. “धूम-३ यावेळी सुपरहिट ठरणार यामागे नक्कीच कोणतीही शंका नाही आणि त्याचे कारण अगदी स्पष्ट आहे. ते म्हणजे अभिनेता अमिर खान व चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता आहे” असे नदीम मंदिवाला या पाकिस्तानमधील चित्रपट वितरकाने सांगितले. 

Story img Loader