अभिनेता आमीर खान आणि अभिनेत्री कतरीना कैफ यांचा आगामी धूम-३ या चित्रपटाच्या उपग्रहाव्दारे प्रेक्षेपणाचे अधिकार ‘सोनी टेलिव्हीजन’ने ७५ कोटी रुपयांना विकत घेतले असल्याची माहीती मिळाली आहे. मिळालेल्या अहवालांवर विश्वास ठेवला असता ‘यशराज फिल्म्’या चित्रपट निर्माती संस्थेच्या चित्रपटाचे उपग्रहाव्दारे प्रक्षेपण अधिकार ७५ कोटी रुपयांना विकले गेले आहेत असा धूम-३ हा सर्वात यशस्वी चित्रपट ठरेल.
यशराज फिल्मच्या प्रवक्त्यांशी संपर्क केला असता “आम्हाला सध्यातरी याबाबत कोणतेही अनुमान करायचे नाहीत” असे म्हटले आहे. धूम-३ या अॅक्शन थ्रीलर चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा ही असणार आहेत. चिकागोमध्ये या दोन अभिनेत्यांबरोबर या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. चित्रपट २५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच चित्रपटात ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ अमिर खानने एका भामट्याची भूमिका साकारली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा