‘धूम ३’च्या निर्मात्यांनी नुकतेच चित्रपटाचे टायटल ट्रॅक प्रदर्शित केले होते. या टायटल ट्रॅकला यू टयूबवर चांगली पसंती मिळाली होती. या टायटल ट्रॅकचा आता अरेबिक मेकओव्हर करण्यात आला आहे. गाण्याचा व्हिडिओ तोच मात्र त्याचे बोल हिंदीऐवजी अरेबिक भाषेत आहेत.
‘धूम ३’मध्ये आमिर हा साहिर या ‘क्लाउन थिफ’च्या म्हणजेच चोराच्या भूमिकेत दिसणार आहे. तर कतरिनाने ‘अॅक्रोबॅट दिवा’ची भूमिका साकारली आहे. अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा हे दोघ आदीच्याच भूमिकांमध्ये दिसणार आहेत. २००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘धूम’मध्ये अमेरिकन गायिका टाटा यंगने गायलेले टायटल ट्रॅक त्यावेळी हिट झाले होते.

Story img Loader