आमिर आणि कतरिनाची जोडी ‘धूम ३’मुळे प्रकाशझोतात आहे. ‘धूम ३’ या बहुचर्चित चित्रपटाच्या टायटल साँगनंतर आता ‘मलंग’ गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या गाण्यावर तब्बल ५ कोटींचा खर्च करण्यात आला आहे.
आमिर आणि कतरिनाने चित्रपटात साहीर आणि आलिया या भूमिका साकारल्या आहेत. टीझरमध्ये काळ्या पोशाखात आपल्या अॅब्स दाखविणारा आमिर त्याला साथ देणारी चित्रपटातील त्याची प्रेमिका कतरिना पाहावयास मिळते. आमिर यात धिटपणे साहसी दृश्ये करताना दिसतो.


‘मलंग, मलंग है इश्क तेरा… ‘या गाण्यास प्रेक्षकांमध्ये चांगलीच पसंती मिळण्याची शक्यता आहे. आमिर व कतरिना यांच्यावर चित्रित करण्यात आलेले ‘धूम ३’ मधील ‘मलंग’ हे गाणे बॉलिवूडमधील आता पर्यंतचे सर्वात महागडे गाणे असल्याचे म्हटले जात आहे. अर्थात, या गाण्यामध्ये सहनर्तक म्हणून भाग घेतलेल्या २०० हून अधीक कलाकारांचे मानधन या ५ कोटी खर्चामधूनच देण्यात आले आहे. या गाण्याचा सेट उभा करण्यासाठी तब्बल दोन महिन्यांचा अवधी लागला.


याआधी प्रदर्शित झालेल्या ‘धूम ३’च्या टायटल साँगला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Story img Loader