सोशल मीडियावर बऱ्याचदा कलाकारांचे थ्रोबॅक फोटो व्हायरल होत असतात. या थ्रोबॅक फोटोमध्ये सेलिब्रिटींच्या कॉलेज जीवनातील, कुटुंबासमवेतचे किंवा बालपणीचे फोटो सर्वाधिक पाहायला मिळतात. कलाकारांच्या या फोटोकडे पाहिल्यानंतर कालानुरुप त्यांच्यामध्ये कसे बदल झाले आहेत ते दिसून येतं. आतापर्यंत रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, सलमान खान, विकी कौशल या कलाकारांचे लहानपणीचे फोटो साऱ्यांनीच पाहिले आहेत. मात्र या सगळ्यामध्ये एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो साऱ्यांचं लक्ष वेधत आहे.

‘रहना है तेरे दिल में’ हा चित्रपट साऱ्यांच्या लक्षात असेल. दाक्षिणात्य सुपरस्टार आर. माधवन या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटामध्ये अभिनेत्री दिया मिर्झाने स्क्रीन शेअर केली होती. दियाच्या करिअरमधला हा पहिलाच चित्रपट होता. परंतु या पहिल्याच चित्रपटाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. गोजीरवाणा चेहरा आणि लोभसवाणं हास्य यामुळे ती आजही तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवते. सौंदर्याने अनेकांना भूरळ घालणाऱ्या याच अभिनेत्रीच्या लहानपणीचा फोटो सध्या चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

Major #FlashbackFriday #80sBaby

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on

;

दिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अॅक्टीव्ह असते. बऱ्याचदा ती इन्स्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. यात तिने तिच्या बालपणीचा फोटोदेखील शेअर केला आहे. दियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती प्रचंड गोड दिसत असून ‘मेजर #थ्रोबॅक फ्रायडे #80s बेबी’, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

वाचा : घटस्फोटानंतर ‘या’ व्यक्तींमुळे सावरले; दिया मिर्झाने सांगितला अनुभव

दरम्यान, दिया मिर्झा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ‘रहना है तेरे दिल में’, ‘तुमको ना भूल पायेंगे’, ‘तुमसा नहीं देखा’, ‘कोई मेरे दिल में है’, ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘हे बेबी’, ‘शूट आउट अॅट लोखंडवाला’ आणि ‘क्रेजी 4’ या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यानंतर लवकरच ती ‘थप्पड’ चित्रपटात झळकणार असून अन्य एका वेब सिरीजमध्येही दिसून येणार आहे.

Story img Loader