‘रहना है तेरे दिल में’ या एव्हरग्रीन लव्हस्टोरीतून अभिनेत्री दिया मिर्झाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती अगदी मोजक्याच चित्रपटांमध्ये झळकली. सहजसोप्या अभिनयाने दियाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. गेल्या वर्षी मे महिन्यात तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. “गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यात माझ्या बाळाचा, अव्यानचा जन्म झाला. त्यामुळे हा काळ माझ्यासाठी खूप भयानक होता” असे दियाने एका मुलाखतीमध्ये सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखती दरम्यान दियाने गरोदर असतानाचा अनुभव सांगितला. दिया म्हणाली की, “माझ्या पोटात बॅक्टेरियल इंन्फे्क्शन झाले होते. या इंन्फेक्शनचा परिणाम अव्यानवर होऊ शकतो असे डॉक्टरांनी सांगितले. पुढे माझ्यावर शस्त्रक्रिया झाली. पोटातील अपेन्डिक्समुळे गर्भाशयामध्ये रक्तस्त्राव सुरू झाला. रक्तस्त्राव वाढल्यास गर्भाशयात रक्त गोठले असते. अशात बाळाच्या जीवाला धोका नको म्हणून पाचव्या महिन्यातच मला बाळाला जन्म द्यावा लागला. जन्माच्या ३६ तासांनंतर लगेच अव्यानवर शस्त्रक्रिया केली गेली. ते काही दिवस खूप जास्त भीतीदायक होते.”
आणखी वाचा- Indian 2 First Look : ‘इंडियन २’चं पोस्टर प्रदर्शित, तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्याला?

“बाळ प्रीमॅच्यूअर असल्यामुळे लगेच तीन-साडेतीन महिन्यांनंतर पुन्हा बाळावर शस्त्रक्रिया झाली. याच काळात अव्यान पूर्ण वेळ लहान मुलांच्या आयसीयूमध्ये होता. मी माझ्या मुलाला जवळ घेऊ शकत नव्हते. त्याच्या जवळ जाण्याची मला परवानगी नव्हती.” अशा शब्दांमध्ये दियाने मनातील भावना व्यक्त केल्या. अव्यानसोबत नसल्यामुळे खूप त्रास झाला असेही ती म्हणाली.

आणखी वाचा-“माझं बाळ आता या जगातच नाही” भाचीच्या निधनानंतर अभिनेत्री दिया मिर्झा भावूक

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी दिया मिर्झा पहिल्यांदा आई झाली. करोना संसर्गाच्या वाढत्या प्रभावामुळे सर्वत्र बंधने लादण्यात आली असल्याने दिया प्रचंड घाबरली होती. “आयसीयूमध्ये असणाऱ्या अव्यानला मी आठवड्यातून दोनदा भेटायला जायचे. पण मला आत जायला मनाई होती. मी लांबून त्याला बघून घरी परतायचे. तीन महिन्यांचा माझा अव्यान खूप लहान होता. करोनाने आम्हाला लांब केले होते. सर्व काही ठीक होईल आणि लवकरच तो माझ्याजवळ असेल या विश्वासावर मी जगत होते.” असे दियाने मुलाखतीत म्हणाले आहे.

मॉडेल म्हणून करियरची सुरुवात करणाऱ्या दिया मिर्झाने अभिनयासह निर्मिती क्षेत्रात देखील काम केले आहे. एप्रिल २०२१ मध्ये तिने वैभव रेखी या भारतीय व्यवसायिकाशी लग्न केले.