बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता दियाने मुलाचा जन्माच्या ४ महिन्यांनंतर त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दियाचा आणि अव्यानचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये दिया आणि अव्यान दिसत आहेत. अव्यानला दियाने कढेवर घेतलं आहे. या फोटोला दियाने स्केच फिल्टर वापरलं आहे. हा फोटो शेअर करत आमच्या अव्यानची कहाणीची सुरुवात झाली आहे. ‘१५.०९.२०२१ अव्यानच्या पहिल्या ४ महिन्यात ज्यांनी त्याची काळजी घेतली त्यासगळ्यांचे आम्ही मनापासून आभार आहोत. सगळ्या डॉक्टरांकडून मिळालेल्या प्रेमाचे आम्ही आभारी आहोत. अव्यान, तू आम्हाला विनम्रता आणि प्रार्थनेत किती शक्ती असते ते शिकवले. तू आम्हाला पूर्ण केले आहे,’ अशा आशयाचे कॅप्शन दियाने तो फोटो शेअर करत दिले आहे.

आणखी वाचा : तुझ्या घराचा रंग पावसाच्या पाण्याने उडाला म्हणणाऱ्यांना हृतिकचं भन्नाट उत्तर, म्हणाला…

पुढे दिया म्हणाली, ‘यावेळी संपूर्ण कुटुंब आणि मित्रांनी केलेल्या प्रार्थनेशिवाय हे शक्य नव्हतं. त्यामुळे सगळ्यांचे आभार. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहित आहे. NICU मध्ये असलेल्या या सगळ्या गोष्टीचा सामना करत असलेल्या सर्व पालकांना, तुमच्यासाठी आणि तुमच्या लहान मुलासाठी प्रेम, शक्ती आणि प्रार्थनाची आवश्यक आहे.’ दियाच्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केली आहे. त्यापैकी एक म्हणजे बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांकाने ही केली आहे. ‘देव तुमच्या सुंदर कुटुंबाला आशीर्वाद देओ,’ अशी कमेंट प्रियांकाने केली आहे.

आणखी वाचा : ‘…चुपचाप खड़ा रह’, नीरज चोप्राचा डायलॉग ऐकून बिग बींची बोलती बंद

दियाने यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बिझनेसमॅन वैभव रेखीसोबत लग्न गाठ बांधली. या दोघांचे हे दुसरे लग्न होते. अव्यान हा दियाचा पहिला मुलगा आहे. तर, वैभवची समायरा ही मुलगी आहे. दिया ‘थप्पड’ या चित्रपटात दिसली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dia mirza shares son avyaan s first pic priyanka chopra blesses her beautiful family dcp