अभिनेत्री सोनम कपूरच्या घरातून पाच लाखांचा हिऱ्याचा हार चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. चोरीबाबत सोनम आणि तिच्या आईने लगेचच जुहू पोलीस स्थानकात जाऊन एफआयआर नोंदविला. सदर संभावित चोरीबाबत पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. ४ तारखेला वांद्रे येथील एका पार्टीवरून जवळजवळ पहाटे दोन वाजता घरी परतल्यावर सोनमने हा हिऱ्यांचा हार एका ड्रॉवरमध्ये ठेवला होता, परंतु नंतर तो सापडला नसल्याचे सोनमने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलीस सर्व शक्यतांचा विचार करून तपास करीत असून, यात सोनमकडून पार्टीमध्येच हार पडल्याच्या शक्यतेचादेखील समावेश आहे. जेव्हा पार्टीच्या ठिकाणाहून सोनम घरी येण्यासाठी निघाली, तेव्हा तिने हार परिधान केला होता का, हे पाहाण्यासाठी पोलिस सीसीटीव्हीची दृष्ये पडताळून पाहणार आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्या नोकरांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा