निर्माता दिबाकर बॅनर्जी आता हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रेक्षकांना ब्योमकेश बख्शीच्या कथांशी अवगत करणार आहे. यासाठी त्याने शरदेन्दु बंडोपाध्याय यांच्याकडून ब्योमकेश यांच्या ३० कथांचे अधिकार आठ-दहा करोड रुपयांमध्ये विकत घेतले आहेत. ब्योमकेशच्या कथांचा बंगाली भाषेव्यतिरेक्त इतर कोणत्याही भाषेसाठी अद्यापपर्यंत उपयोग करण्यात आलेला नाही. मात्र, आता त्यांच्या कथेवर ‘डिटेक्टीव ब्योमकेश बख्शी’ हा चित्रपट बनविण्यात येणार आहे. दिबाकरची चित्रपट निर्माता कंपनी आणि यश राज फिल्म हे संयुक्तपणे हा चित्रपट चित्रीत करणार आहेत.
दिबाकर म्हणाले की, माझी चित्रपटाची मालिका पूर्ण होईपर्यंत कोणीही ब्योमकेश यांच्यावर चित्रपट बनवू नये यासाठी मी त्यांच्या कथांचे सर्वाधिकार विकत घेतले आहेत. जर मी असे केले नसते तरी कोणीही त्यांच्या एका कथेवर चित्रपट बनवू शकतो. त्यामुळे ब्योमकेश यांच्यावर अनेक कथा बनतील आणि त्याचे नुकसान माझ्या चित्रपटाला होऊ शकते.
ब्योमकेश यांच्या कथेचा ग्राफिक कादंवरीत रुपांतरण करण्याचाही दिबाकर विचार करत आहे. १९४२ सालातील पार्श्वभूमीवर चित्रीत करण्यात येणा-या ‘डिटेक्टीव ब्योमकेश बख्शी’ या चित्रपटात ब्योमकेश यांची भूमिका सुशांत सिंह राजपूत करणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader