गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर सतत कोणत्या ना कोणत्या चित्रपटाला बॉयकॉट केले जात आहे. तर दुसरीकडे प्रेक्षकही बॉलिवूड चित्रपटांकडे पाठ फिरवत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’, अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ चित्रपट तर प्रदर्शनापूर्वीच नकारात्मक चर्चेत आला होता. यामुळे त्या दोन्ही चित्रपटाला त्याचा फटका बसला. बॉलिवूडमधील अनेक कलाकार यावर त्यांचे मत व्यक्त करताना दिसत आहे. नुकतंच बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी याबाबत अप्रत्यक्षरित्या प्रतिक्रिया दिली आहे.

अमिताभ बच्चन हे ट्वीटरवर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध विषयांवर त्यांचे मत मांडताना दिसतात. नुकतंच अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी बॉलिवूडमधील बॉयकॉट ट्रेंडबद्दल भाष्य केले आहे. अमिताभ बच्चन यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. त्यात ते म्हणाले, काही गोष्टी करायच्या आहेत. पण कसे करणार? आजकाल तर प्रत्येक गोष्टीची ‘गोष्ट’ बनते. बिग बींनी केलेले हे ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
आणखी वाचा : ‘केबीसी’च्या प्रत्येक भागासाठी बिग बी घेतात इतकं मानधन?

अमिताभ बच्चन यांच्या या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. त्यांनी मांडलेल्या या मतावर अनेकजण व्यक्त होताना दिसत आहे. अनेकांना त्यांचे हे विचार पटलेले आहेत. तर काहीजण याचा विरोध करत आहेत.

अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा करोनाची लागण झाली आहे. त्यांची करोना चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. “नुकतीच माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया मागच्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली करोना चाचणी करून घ्यावी.” असे आवाहन त्यांनी त्यांच्या ट्वीटद्वारे केले होते.

आणखी वाचा : Amitabh Bachchan Corona Positive: अमिताभ बच्चन यांना पुन्हा करोनाची लागण, ट्वीट करत बिग बी म्हणाले…

दरम्यान त्यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात ते महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्टसह अमिताभ बच्चन यांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांनाही बरीच उत्सुकता आहे. हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.