बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रणवीर आणि दीपिका पदुकोणची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. आज रणवीरचा ३७ वा वाढदिवस आहे. रणवीरच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या वैवाहिक जीवनाविषयी जाणून घेऊया.

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

रणवीर आणि दीपिकाचं लग्न २०१८ साली झालं. हे दोघे सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्ट शेअर करताना दिसतात. त्या दोघांच्या लग्नानंतर दीपिकाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण काही काळापूर्वी दीपिकाचा ‘गहराईया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात दीपिकाला तिच्या आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिलेल्या इंटिमेट सीनसाठी रणवीरची परवानगी घेतली होती का असा प्रश्न अनेकांनी सोशल मीडियावर विचारला होता.

आणखी वाचा : “ऋषीजी गेल्यानंतर तुम्ही खूप फिरत आहात”; नीतू कपूर यांच्या ‘या’ व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

आणखी वाचा : धनंजय मानेच्या नावाने मीम्सचं पेज चालवणाऱ्याची अशोक सराफांनी घेतली शाळा, फोटो शेअर करत; म्हणाला…

‘बॉलिवूड बबल’शी बोलताना दीपिका म्हणाली, ‘जर यावर मी प्रतिक्रिया दिली तर तो मुर्खपणा ठरेल. मी कधीच कमेंट्स वाचत नाही आणि मला वाटतं रणवीरही अशा कमेंट वाचत नसावा. माझ्या मते असं करणं मुर्खपणा लक्षण आहे. रणवीरबद्दल सांगू तर त्याला माझ्या कामाचा अभिमान वाटतो. माझ्या चित्रपटाचाही त्याला अभिमान वाटेल. या चित्रपटातील माझा अभिनय देखील त्याला आवडला आहे.’

आणखी वाचा : शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटात होणार विजय सेतुपतीची एण्ट्री, ‘या’ अभिनेत्याची घेणार जागाआणखी वाचा :

दरम्यान दीपिकानं एका मुलखातीत ‘गहराइयां’ सारखा बोल्ड चित्रपट निवडण्याचं श्रेय पती रणवीर सिंहला दिलं होतं. त्यामुळेच मी एवढी बोल्ड झाले असं ती म्हणाली होती. शकुन बत्रा दिग्दर्शित ‘गहराइयां’ चित्रपटात अनन्या पांडे, दीपिका पदुकोण, धैर्य कारव आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ११ फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. चित्रपटात आधुनिक नातेसंबंधांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

Story img Loader