बॉलीवूडचे बरेचसे कलाकार सोशल मिडियावर सक्रिय आहेत. त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. ट्विटर आणि फेसबुकवर तिला करोडो चाहते फोलो करतात. चाहत्यांसोबत अधिकाधिक संपर्कात राहण्यासाठी प्रियांकाने नुकताच रेडिटवरून संवाद साधला होता. मात्र, चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे प्रियांका चांगलीच तोंडघशी पडली.
पिटबुलसोबत प्रियांकाचा एक अल्बम नुकताच लॉन्च झाला होता. त्यावरून तिच्या चाहत्याने हा अल्बम करण्यासाठी तू पिटबुलसोबत शारिरीक संबंध ठेवले होतेस का असा विचित्र प्रश्न रेडिटवर विचारला. या प्रश्नानंतर प्रियांकावर विचित्र आणि लाजिरवाण्या प्रश्नांचा मारा झाला. प्रियांकाला विचारण्यात आलेले काही निवडक प्रश्न.
१. प्रियांका, तुझ्या वडिलांच्या निधनानंतर अंधेरीतील एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले. तुझ्या वडिलांनी असं काय योगदान केलं आहे की त्यांच नाव रस्त्याला देण्यात आलं?
२. पिटबुलसोबत तुझे शारिरीक संबंध होते का?
३. प्रियांका क्या आपके टूथपेस्ट मे नमक है?
४. तू गाणे थांबवशील का?
५. तू तुझ्या चेह-याची प्लास्टिक सर्जरी केली आहेस का?
६. तुझ्या वडिलांवर बाललैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आला होता, त्याबाबत तुझे काय म्हणणे आहे?
कधी कधी चाहत्यांशी संवाद साधण्यामध्ये सेलिब्रिटींना अवघड समस्यांना सामोरे जावे लागते याचा पुरेपूर प्रत्यय यावेळी प्रियांकाला आल्यामुळे तिने अखेर रेडिवरून काढता पाय घेतला.