रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा हे सध्या अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटासाठी दक्षिण श्रीलंकेतील तिस्सा शहरात चित्रीकरण करत आहेत. खास बाब म्हणजे या दोघांचे तथाकथित प्रियकर- कतरिना कैफ आणि विराट कोहली हे त्यांना भेटण्यासाठी तेथे गेले आहेत.
९ मार्चला विराट कोहली आणि कतरिना कैफ त्यांच्या तथाकथित प्रेयसी आणि प्रियकरासोबत वेळ घालविण्याकरिता श्रीलंकेत पोहचले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दोन्ही प्रेमीयुगुलांनी एकत्र वेळ घालवला आणि एकत्र चित्रपटही पाहिला. काही दिवसांपूर्वीच सजेशन्ससाठी विराट कोहलीने ट्विटर या सोशल साइटची मदत घेतली आहे. “आरामाचे दिवस. चित्रपट पाहण्याची इच्छा होत आहे. काही सजेशन्स?”, असे विराट कोहलीने ट्विट केले होते. परंतु, ही ट्रिप लहान होती. कारण, गुरुवारीच (१३ मार्च) विराट कोहली कोलंबोवरून परत आलेला विमानतळावर दिसला. दुसरीकडे, कतरिना अजूनही श्रीलंकेतच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा