शनिवार २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकला. या छाप्यामध्ये बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत आणखी लोकांना ताब्यात घेण्यात आले. रविवारी आर्यनला एनसीबीने अटक केली. त्यानंतर आर्यनसह इतर सात जणांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे या सर्वांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर आर्यनची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. विशेष सत्र न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीत आर्यनचा जामीन नाकारला गेला. त्यानंतर आता शाहरुखने केस लढवण्यासाठी त्याचे वकील बदलले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीबीच्या काही तपासादरम्यान काही नवी माहिती लागली आहे. काही आरोपींची चौकशीदेखील कऱण्यात आली असून यावेळी मिळालेली माहिती कोर्टासमोर सादर केली जाणार आहे. दरम्यान, टीव्ही ९ने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुख खानने त्याचे वकील सतीश मानेशिंदे यांच्या ऐवजी केस लढण्यासाठी अमित देसाई यांची निवड केली आहे. अमित देसाई यांनी २००२ मध्ये सलमान खानची हिट आणि रन केस लढवली होती. यामुळे सलमान खाननेच शाहरुखला वकील बदलण्याचा सल्ला दिला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

आणखी वाचा : ‘तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती’, शाहरुखसोबतचा फोटो शेअर करणं जॉनी लिव्हर यांना पडले महागात

क्रूझवरील अंमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान यावेळी एनसीबीकडून आर्यन खानच्या जामीन अर्जाला विरोध केला जाण्याची शक्यता आहे.

Video: …अन् NCB च्या कार्यालयामधून मुलाला भेटून बाहेर पडताना गौरी खानला अश्रू अनावर

गेल्या सुनावणीत काय झालं होतं –
कोणत्याही प्रकारचे अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आले नसताना त्याला कोठडीत ठेवणे उचित नाही. असे करून त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य पणाला लावले जात आहे. त्यामुळे त्याच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी आर्यनच्या वकिलांनी सोमवारी विशेष सत्र न्यायालयात केली होती. जामीन अर्जावर तातडीने सुनावणीची आवश्यकता नसल्याचे सांगत अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी आठवडय़ाची वेळ देण्याची मागणी एनसीबीतर्फे करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने मात्र प्रकरणावरील सुनावणी बुधवारी ठेवत एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते.

मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यनसह अन्य आरोपींनी जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. विशेष सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांच्यासमोर आर्यनसह अन्य आरोपींच्या जामिनावर सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी याप्रकरणी आर्यनला गोवण्यात आले असून जामिनावर सुटका केली तर प्रकरणाचा तपास थांबणार नसल्याचा दावा आर्यनतर्फे वरिष्ठ वकील अमित देसाई यांनी केला.

मी निर्दोष असून कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही. अमली पदार्थ बाळगणे, निर्मिती, खरेदी, विक्री, वाहतूक, आयात, निर्यातीशी संबंधित असल्याचा वा आरोपींना आर्थिक साहाय्य केल्याचा एकही पुरावा एनसीबीने सादर केलेला नाही. समाजाशी बांधील असल्याने जामिनावर सुटका केल्यावर मी पळून जाणार नाही, असा दावाही आर्यनच्या जामिनाची मागणी करताना करण्यात आला. त्यावर प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून मोठय़ा प्रमाणात पुरवे गोळा करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तपासाच्या या टप्प्यावर आर्यनला जामीन देण्यात आल्यास त्याच्याकडून पुरावे नष्ट करण्याची शक्यता एनसीबीतर्फे व्यक्त करण्यात आली होती.

आर्यन खानसह ७ जणांना सध्या १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई सत्र न्यायालयाने याआधी आर्यन खानसह इतर ७ आरोपींना एनसीबी कोठडी देण्याची मागणी फेटाळत त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. याविरोधातच सध्या आर्यन खानकडून विशेष सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.