Jasmin Walia Hardik Pandya dating rumors: भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या मागच्या काही महिन्यांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. हार्दिक पंड्या व नताशा यांनी महिनाभरापूर्वी त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली. चार वर्षांच्या संसारानंतर हे दोघेही विभक्त झाले आहेत. नताशा सध्या सर्बियामध्ये आहे. अशातच हार्दिकच्या एका पोस्टनंतर तो एका गायिकेच्या प्रेमात पडल्याचं म्हटलं जात आहे.

हार्दिक पंड्या आणि ब्रिटीश गायिका जास्मिन वालियाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. जास्मिनने नुकताच इन्स्टाग्रामवर निळ्या रंगाच्या बिकिनीतील एक फोटो पोस्ट केला होता. फोटोत ती स्विमिंग पूलजवळ स्टायलिश पोज देताना दिसली. मग थोड्याच वेळाने सारखंच बॅकग्राउंड असलेल्या पूलजवळचा फोटो हार्दिक पंड्याने शेअर केला. दोघांचे हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी हे एकत्र असल्याचे अंदाज बांधायला सुरुवात केली. जास्मिन व हार्दिक ग्रीसमध्ये एकत्र सुट्टी घालवत आहेत, असं त्यांच्या फोटोंवरून दिसून आलं. त्यानंतर एका रेडिट युजरने जस्मिनच्या समुद्रकिनाऱ्यावरील दुसऱ्या एका फोटोत हार्दिक असल्याचं म्हटलं आहे.

selena gomez engaged
प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेजने उरकला साखरपुडा, कोण आहे होणारा पती? जाणून घ्या
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
hina khan cancer battle
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Shabana Azmi And Nandita Das
“नंदिताने तिचे बोट माझ्या ओठांवर…”, ‘फायर’ चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल शबाना आझमी म्हणाल्या, “ते काही रोमँटिक…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर

हार्दिक पंड्या नताशाशी घटस्फोट झाल्यानंतर ‘या’ गायिकेला करतोय डेट? जाणून घ्या कोण आहे ती?

singer jasmin walia dating hardik pandya
जास्मिन वालिया व हार्दिक पंड्या यांनी शेअर केलेले फोटो (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

रेडिटवर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात जास्मिनने बिकिनी घातलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या शेजारी टॅटू असलेल्या व्यक्तीचा हात दिसत आहे. हा हात हार्दिकचा असून त्याच्या हातावर असा टॅटू आहे, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. हार्दिक व जास्मिन एकमेकांना डेट करत असल्याचा हा पुरावा आहे, असं चाहते म्हणत आहेत. मात्र, फोटोमध्ये दिसणारा हात हा हार्दिकचा आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही.

कोण आहे जास्मिन वालिया?

Who is Jasmin Walia: जास्मिन एक ब्रिटिश गायिका आणि टीव्ही पर्सनॅलिटी आहे. तिचा जन्म इंग्लंडमध्ये भारतीय वंशाच्या आई-वडिलांच्या पोटी झाला. तिचं ‘बॉम डिगी डिगी’ हे गाणं खूप लोकप्रिय आहे. २०१८ मधील ‘सोनू के टीटू की स्वीटी’ साठी तिने झॅक नाइटबरोबर हे गाणं केलं होतं. तसेच ती बिग बॉस १३ फेम असीम रियाझसह ‘नाइट्स एन फाईट्स’ या म्युझिक व्हिडीओमध्येही झळकली होती.

हार्दिक-जास्मिनच्या डेटिंगच्या चर्चेदरम्यान नताशाने शेअर केली इन्स्टा स्टोरी; म्हणाली, ‘योग्य वेळ आल्यावर देव…’

हार्दिक-नताशाचा घटस्फोट

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: नताशा व हार्दिक यांनी ३१ मे २०२० रोजी लग्न केले होते. नंतर या जोडप्याने फेब्रुवारी २०२३ मध्ये पुन्हा हिंदू व ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केले. या वर्षी मे महिन्यात नताशाने तिच्या नावातून ‘पंड्या’ वगळल्यानंतर या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होऊ लागल्या. दोघांनी १८ जुलैला एक पोस्ट करून घटस्फोटावर शिक्कामोर्तब केलं. सध्या नताशा मुलगा अगस्त्यबरोबर सर्बियामध्ये आहे.

Story img Loader