बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या अफेअर्समुळे चर्चेत असतो. संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय या अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले जाते. खासकरून सलमान आणि ऐश्वर्या यांचं रिलेशनशिप तर चांगलचं चर्चेत होतं. जेव्हा सलमानने ऐश्वर्याला दारूच्या नशेत मारहाण केल्याचे वृत्त आले होते. आता त्याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीही असेच आरोप करत असल्याचं दिसत आहे.
सोमी अलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सलमान खान आणि भाग्यश्री यांच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील दृश्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हे स्क्रीन शॉट शेअर करत सोमी म्हणाली, “बॉलिवूडचा हार्वी वीन्सटीन, एक दिवस तुझही भांड फुटणार. तू ज्या महिलांवर अत्याचार केलेत त्या एक दिवस बाहेर येतील आणि त्यांचे सत्य सांगतील. जसे ऐश्वर्या राय बच्चनने केले.”
आणखी वाचा : “बॉलिवूडमध्ये एकतरी काळी अभिनेत्री दाखवा…”, नवाजुद्दीन सिद्दीकीने केलेले वक्तव्य चर्चेत
आणखी वाचा : या चित्रात तुम्ही सगळ्यात आधी काय पाहिले? यावरून कळेल तुमचे व्यक्तीमत्त्व
हार्वी वीन्सटीन हा एक प्रसिद्ध हॉलिवूड निर्माता आणि चित्रपट निर्माता आहे. हार्वीवर एक, दोन नव्हे तर अनेक महिला आणि अभिनेत्रींनी बलात्कार, मारहाण, लैंगिक अत्याचार आणि धमक्या दिल्याचे आरोप होते. यामध्ये लिसा कॅम्पबेल, एवा ग्रीन, ऐंजिलना जोली या प्रसिद्ध अभिनेत्रींचा समावेश होता. त्यानंतर हार्वी वीन्सटीनला न्यायालयाने २३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
आणखी वाचा : या ४ अक्षरांच्या स्त्रिया पतीला बनवतात श्रीमंत, जाणून घ्या त्यांच्याविषयी
जेव्हा ऐश्वर्या राय आणि सलमान खान रिलेशनशिपमध्ये होते. तेव्हा, काही काळानंतर दोघांमध्ये वाद झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. सलमानवर आरोप करण्यात आले होते की तो ऐश्वर्याला दारूच्या नशेत मारहाण करायचा आणि तिला फोनवरून धमकावत असे. मात्र, सलमान नेहमीच असे सर्व आरोप फेटाळत आला आहे.
सोमी अली ही पाकिस्तानी वंशाची अमेरिकन नागरिक आहे. सोमीला सलमान खूप आवडत होता आणि त्यामुळेच ती वयाच्या १६ व्या वर्षी मुंबईत आली होती. काही काळ रिलेशनशिपमध्ये राहील्यानंतर सोमी आणि सलमानचा ब्रेकअप झाला. त्यानंतर सोमी अमेरिकेला परतली. मग सोमीने आपले शिक्षण पूर्ण केले आणि आता ती एनजीओ चालवते.