सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र सुशांतनं अचानक साराला अनफॉलो केल्यापासून या दोघांमध्ये बेक्रअप झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या. साराचा स्वभाव या दोघांमधील वादाचं प्रमुख कारण असल्याचं म्हटलं जात आहे.
सारा सुशांतवर अधिकच हक्क गाजवत होती. सुशांतला साराचा स्वभाव खटकत होता म्हणून या दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात आहे. सारा आणि सुशांतमध्ये अनेक गोष्टींवरून वाद होते हे वाद कधीतरी क्षमतील असं दोघांना वाटलं होतं मात्र वादानं आता टोक गाठलं आहे म्हणूनच या दोघांनी आपल्या वेगळ्या वाटा निवडण्याचं ठरवलं असल्याचं म्हटलं जात आहे.
‘केदारनाथ’ चित्रपटातून सारानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रमुख भूमिकेत होता. या चित्रपटापासून सारा आणि सुशांतच्या अफेअरची चर्चा होती अनेक सार्वजनिक ठिकाणी ते दोघंही एकत्र वावरताना दिसले. मात्र अचानक सुशांतनं त्याच्या इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डीलीट करत साराला अनफॉलो केलं तेव्हापासून या दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आहेत.
साराची कार्तिक आर्यनसोबतची वाढती जवळीक ही देखील दोघांमध्ये आलेल्या दुराव्याचं प्रमुख कारण असल्याचं म्हटलं जात आहे. सारा सध्या कार्तिक सोबत तिच्या आगामी चित्रपटात व्यग्र आहे.